परतुरात शूक्रवारी श्रीराम मंदिर निर्माण समर्पण महाअभियान भव्य शोभायात्रेचे आयोजन , दि.१५ जानेवारी पासून तालुक्यातील १११ गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत ११०० कार्यकर्ते पोहचणार
परतूर(प्रतिनिधी) - समस्त भारत वासीयांचे आदर्शवत महापुरुष श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहावे, असे भारतातील प्रत्येकाला वाटत होते, ते श्रीरामाच्या मंदिर निर्माणाचे ध्येय आता लवकरच पूर्ण होणार आहे.यानिमित्ताने श्रीरामाच्या मंदिर निर्माणात देशभरातील प्रत्येक कुटुंबातील, प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागावा म्हणून संबंध देशभरात दि.१५ जानेवारी पासून या महाअभियानाची सुरुवात होत आहे.या अनुषंगाने परतूर शहरात शूक्रवार.१५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रेल्वे गेटपासून लेझीम पथकासह व वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही शोभायात्रा पोलीस स्टेशन मार्गे दसमले चौक मार्गे नारायण दादा पवार चौकात जाणार आहे.या यात्रेचा समारोप नारायण दादा पवार चौकात होणार आहे.गुरुवार दि.१५ जानेवारी पासून पुढील एक महिना दि.१५ फेब्रुवारीपर्यंत या अभियानाच्या निमित्ताने परतूर शहरातील व तालुक्यातील ११०० कार्यकर्ते ३ उपखंड,११ मंडलातून १११ गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मंदिर निर्माणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.शहरात गुरुवार दि.१५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य शोभायात्रेत समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचे आवाहन परतूर तालुका श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.