न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने दर्पणदिनानिमित्त मान्यवर पत्रकारांसह गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार' मोठ्या संख्येने उपस्थित रहा -विकासकुमार बागडी


जालना : (प्रतीनीधी)६ जानेवारी अर्थात् पत्रसृष्टीचे पितामह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिन ! त्याच अनुषंगाने असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास संंबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशनचे जालना जिल्हा अध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे. या संदर्भातील प्रसिध्दी पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, बुधवार,दि.६ जानेवारी २०२० रोजी आयएमए हॉल, भोकरदन नाका, जालना येथे  सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास सुप्रसिध्द उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री घनशामसेठ गोयल, कैलासजी लोया, सतीषजी अग्रवाल, सुभाषजी देविदान,विनीत साहणी, विनयजी कोठारी, डॉ.ओमजी अग्रवाल, रवीसेठ अग्रवाल, तुलजेसभैय्या चौधरी, डुंगरसिंगजी पुरोहित,चेतनभाऊ कांबळे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत! याच कार्यक्रमात पत्रकारितेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, पत्रकारितेसाठी समर्पित भावनेने वृत्तपत्र चालवले, वृत्तपत्र चालवण्याची मोठी कसरत केली आणि करत आहेत असे पत्रकार सर्वश्री अंकुशरावजी देशमुख, भारतजी धपाटे, विजयजी सकलेचा, संजयजी भरतिया, बद्रीनाथजी टेकाळे, अविनाशजी कव्हळे,रविजी बांगड, ओमप्रकाशजी शिंदे, अनुपजी उर्फ गोपाल राठी,  धमेंद्रजी जांगडे, महेशजी जोशी, पारसजी नंद, अमितजी आनंद आणि लियाकतअली खान या मान्यवर पत्रकार मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. तर ज्या जुन्या- जाणत्या मंडळींनी पत्रकारितेला उभारी देण्याचे कार्य केले. ज्यावेळी संगणक प्रणालीही अस्तित्वात नव्हती आणि भ्रमणध्वनीची सुविधा देखील फारकाही व्यवस्थीत नव्हती, अशा काळात पत्रकारितेत स्वत:ला वाहून घेत अत्यंत चांगल्या पध्दतीने या क्षेत्रात नावलौकिक मिळवला ते सर्वश्री सतीशजी सुदामे, शशिकांतजी पटवारी, ललित पटवारी, लक्ष्मीनारायण गौड, जुगलकिशोर शर्मा, रमेश पाटील, उदयजी पटवारी, अलिमभाई, मनोहर बुजाडे, रमण गायकवाड, दिगंबर शिंदे, अबु हसन, रतनलाल कुरिल, आनंदकुमार जैस्वाल, संतोष भालेराव, राजेंद्र तिरुखे यांचा मरणोत्तर गौरव करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्रात ज्यांनी पडद्यामागची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. आपल्या कार्यकुशलतेची छाप दाखवली मात्र ज्यांचा आजपर्यंत कुणीही आदर- सत्कार केल्याचे ऐकिवात आलेले नाही. ज्यांच्या कामाचे श्रेय दुसर्‍यांना मिळाले किंवा ते दुसर्‍यांनीच घेतले, अशा गुणीवंत कर्मचार्‍यांचाही या कार्यक्रमात भेट वस्तू देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आपण आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाच्या जालना जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड