आता एखादा जिल्‍हा नव्‍हे तर संपूर्ण महाराष्‍ट्रातील पत्रकारांची मोबाईल अॅप मध्‍ये नोंदणी होणार आहे.संपूर्ण महाराष्‍ट्रातील प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधवांची फोटोसह माहिती सर्वांसाठी आता एका क्लिक वर उपलब्‍ध होणार आहे.


दि.६ जानेवारी (दर्पण दिन / पत्रकार दिन) रोजी "महासंपर्क अॅप" या मोबाईल अॅपचे निर्माता पत्रकार परवेज पठाण यांच्‍या आई सौ.फैमिदा व वडील श्री. इब्राहीम पठाण (जेष्‍ठ पत्रकार) यांच्‍या हस्‍ते लोकार्पण झाले. सदरील शुभारंभा पासूनच सशुल्‍क नोंदणीला सुरूवात झाली आहे. 

महाराष्‍ट्रात पहिल्‍यांदाच अशा प्रकारचा अॅप लॉन्‍च झाला असून पहिल्‍यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पत्रकारांची माहिती अॅपच्‍या माध्‍यमातून नोंदणी केली जात आहे. 

सदरील "महासंपर्क अॅप" मध्‍ये वर्तमानपत्र / पोर्टल / चॅनलचे नाव, लोगो अथवा टायटल बॅनर, थोडक्‍यात माहिती, पत्रकाराचे नाव, पत्रकाराचा फोटो, मोबाईल नंबर व पत्‍ता टाकण्‍यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, चांगली स्‍पीड, फुल स्‍क्रीन मध्‍ये माहिती, अनेक सुविधा तसेच वापरण्‍यास सहज व सोपा असलेला हा "स्‍वदेशी" अॅप आपणांस नक्‍कीच आवडेल यात शंका नाही. 

योग्‍य प्रकारे नोंदणीला सुरूवात व्‍हावी यासाठी पहिल्‍या आठवड्यात म्‍हणजेच दि. ६ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या ४ जिल्‍ह्यातील पत्रकारांची नोंदणी होणार आहे. त्‍यानंतर संपूर्ण महाराष्‍ट्रातील पत्रकारांची नोंदणी सुरू होणार आहे. 

पत्रकार बांधंवासह समस्‍त नागरिकांनाही संपर्काच्‍या दृष्‍टीने या महासंपर्क अॅपचा नक्‍कीच फायदा होणार आहे. सर्वांना उपयोगी ठरण्‍यासह सर्वांच्‍या आवडीस पात्र ठरावा या दृष्‍टीने मागील ३ महिन्‍यांपासून या नाविण्‍यपूर्ण अॅपसाठी प्रचंड मेहनत घेण्‍यात आली आहे.

पत्रकारिता क्षेत्रात खरोखर कार्यरत असणाऱ्या योग्‍य त्‍या पत्रकारांचीच नोंदणी व्‍हावी असे अनेक पत्रकार बांधवांचे मत अथवा सूचना आहे. त्‍या दृष्‍टीने काही नियम व अटी ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

महासंपर्क अॅपमुळे महाराष्‍ट्रातील पत्रकार बांधव एकमेकांच्‍या संपर्कात तर येतीलच शिवाय सर्व पत्रकार बांधवांसह नागरिकांनाही हा मोबाईल अॅप संपर्काच्‍या दृष्‍टीने सहाय्यक ठरेल यात शंका नाही.
------------------------------------
*व्‍यापारी बांधवांचीही नोंदणी :-* 
औरंगाबाद व जालना जिल्‍ह्यातील गांव ते जिल्‍ह्यापर्यंतच्‍या उद्योजक, व्‍यापारी बांधवांनाही "महासंपर्क अॅप" या मोबाईल अॅप मध्‍ये सशुल्‍क नोंदणी करता येणार आहे.

एका क्लिकवर व्‍यवसायाची माहिती उपलब्‍ध होणार असून उद्योग/ व्‍यवसाय वाढीसाठी हा अॅप नक्‍कीच सहाय्यक ठरणार आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश