स्व.किशोर अग्रवाल यांना पत्रकारांची श्रध्दांजलीशहरातील चौकात पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार-विकासकुमार बागडी
जालना,दि.13 (प्रतिनिधी) रुपम ग्रुपचे चेअरमन, ज्येष्ठ समाजसेवक स्व. किशोर अग्रवाल यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडीयम न्यूज पेपर्सच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील हॉटेल मधुबन येथे झालेल्या शोक सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान, यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी म्हणाले की, स्व. किशोर अग्रवाल यांची समाजसेवा खर्याअर्थाने वाखण्याजोगी होती. गरिबांना मदत करणे हा त्यांचा छंद होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळातही त्यांनी भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यांची ही सेवा विसरण्याजोगी नाही. त्यांच्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांची प्रतिमा शहरातील एखाद्या चौकात उभारुन त्या चौकाला स्व. किशोरसेठ अग्रवाल असे नाव देण्यात यावे, अशी आपण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांसह सर्व संबंधितांकडे करणार असून तशा आशयाचे निवेदनही उद्या सोमवारी देणार असल्याचे यावेळी संंघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लियाकतअली खान यांनी केले. तर शोकसभेस रवि अग्रवाल, राम अग्रवाल यांच्यासह नरेश धारपवळे, मुकेश परमार, विजय जाधव, सिताराम तुपे, ईर्शाद शेख, दिनेश नंद, नदीम कुरेशी, अशपाक पटेल, सुनिल खरात, राहुल वाहुळे, संतोष भुतेकर, सोनाजी झेंडे, इलियास शेख अब्बास, दिपक शेळके, शहानवाज कुरेशी, मयूर अग्रवाल, मधुकर मुळे, धंनंजय देशमुख, रुख्मीणिकांत दिक्षीत आदी पत्रकारांची उपस्थिती होती.