परतुर विभागासाठी त्वरीत डिवाएसपींची नियुक्ती करा- काकडे
जालना जिल्ह्यातील परतुर ऊपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मध्ये गेली दोन महिने झाले आहे. नेहमीप्रमाणे डिवाएसपी आद्याप नेमवलेले नसल्याने सर्व कारभार भोकरदनचे डिवाएसपी ईंदलसिंग बहुरे यांच्याकडे चार्ज आसल्याने त्यांच्यावर भोकरदन विभागासह ईतर पाच पोलीस ठाणेचा भार आहे.परतुर पोलीस उपविभागीय अधिकारी श्री बांगर हे सेवानिवृत्त झाले आसुन त्यांच्या जाग्यावर नविन डिवाएसपी अद्याप का नाही? आसा सवालही मनसेचे काकडे यांनी केला आहे. म्हणुन परतुर विभागाला गृहमंत्रालयाने तात्काळ नविन ऊपविभागीय पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी गृहमंत्रालयाचे स्वीय सहाय्यक पालांडे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. गृहमंत्रालयाचे सध्या जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष आसुन याकडे गृह खात्याने लक्ष घालावे आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे. मंठा,परतुर,आष्टी तसेच सेवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रहाण्याची व्यवस्था नाही. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या रहाण्यासाठी या सर्व हद्दीतील पोलीसांना गृहमंत्रालयाने चांगल्या दर्जाचे पोलीस काॅर्टरसाठी निधी ऊभा करुन द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केली आहे.