सातोनकर हॉस्पिटल व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार उदघाटन


परतूर (प्रतिनधी) डॉ प्रदीप सतोनकर व भारतिय जनता युवा मोर्चा च्या वतीने कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री बबनराव लोणीकर,युवा मोर्चा प्रदेशध्यक्ष विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून  भाजपा नगरसेवक सुधाकर सतोनकर यांचे चिरंजीव डॉ प्रदीप सातोनकर(M.B.B.S.,DCH) व प्रवीण सातोनकर यांच्या सह डॉ.बाबासाहेब गायकवाड (M.B.B.S.DCH,DNB) दिल्ली,हे परतूर येथे 30 बेड असलेले कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण सातोनकर यांनी दिली आहे.
सदरील संजीवनी कोविड सेन्टर चे उद्घाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते दिनांक 28 रोजी करण्यात येणार असून या वेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
     युमो प्रदेशमहामंत्री राहुल लोणीकर यांनी परतूर शहरात हॉस्पिटल सुरू व्हावे या करिता डॉ प्रदीप सातोनकर यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटल सुरू करण्या संदर्भात निंर्णय घेण्यात आला
  या हॉस्पिटलमध्ये 14 ऑक्सिजन बेड, 16 आयसुलेशन बेड उपलब्ध राहणार असून ग्रामीण भागातील वाढलेल्या कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेऊन मतदार संघातील जनतेला या काळात दिलासा देण्यासाठी ही हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना अस्तित्वात आणली असल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हंटले आहे
   या मुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे ही त्यांनी म्हंटले आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले