भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष संदीपजी बाहेकर यांची कोविड रुग्णाच्या कुटुंबियांना मदत,माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून राबवला उपक्रम


परतूर येथे कोविड सेंटर मध्ये ऍडमिट रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने भाजपा चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्य संदीपजी बाहेकर यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून परतूर कोविड सेंटर येथे ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था करून, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी पुढाकार घेतला असून परतूर येथे रोज सकाळ संध्याकाळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना डब्बा पुरवण्याचे काम ते करत आहेत.
 या संदर्भात संदीप बाहेकर म्हणाले की या कठीण प्रसंगी हॉटेल बंद असून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण उपलब्ध होत नाही हा विचार करून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून आपण ही सेवा करीत असल्याचे सांगितले
  पुढे संदीप बाहेकर म्हणाले की, आज कठीण परिस्थिती असून,या काळात आपण खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर देण्याची गरज असून या साठी आपण हा उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात