जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करा,मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांची मागणी



मंठा(प्रतीनीधी)जालना येथीेल संजीवनी हॉस्पिटलने रुग्णसेवेच्या नावाखाली कोरोना सारख्या आजाराच्या मोठ्या संकटात बाजार मांडुन पैसे थाटण्याचा व्यावसाय ऊभारला आसल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या हाॅस्पीटलमध्ये रूग्ण नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आपल्याला येत आसुन आव्वाच्या सव्वा बिल लाऊन सर्व सामाण्य लोकांना वेठीस धरण्याचे काम हे हाॅस्पीटल करत आसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जालना येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये डाॅक्टरांचा मनमानी कारभार आसुन या हाॅस्पीटलमध्ये राजकीय व बड्या लोकांनाच चांगली सेवा देत आसुन याकडे जालना जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक  हाॅस्पीटलने व औषधी विक्रेते यांनी सर्व सामान्य लोकांसाठी रेमडेसविर व व्हेंटीलेटर व आॅक्सीजनची व्यवस्था करावी आसी मागणी मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसविर इंजेक्शन्सचा काळा बाजार चालू असून हा  काळाबाजार थांबवावा व सर्व सामान्यांना रेमडेसविर उपल्ब्ध करून चांगल्या पद्धतीने ऊपचार यंत्रणा राबवावी व सर्व सामाण्य लोकांचे हाॅस्पीटल बिल कमी करुन त्यांच्या आडचणी जिल्हाधिकारी यांनी सोडवावी आसी मागणी सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात