भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिवस आपापल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून साजरा करावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर
परतूर प्रतिनिधी
दिनांक 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेचा दिवस कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून स्थापना दिवस साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा स्थापना दिवसाच्या शुभमुहूर्तावर आपण कार्यकर्त्यांनी सर्व बुथ वर मोठ्या उत्साहाने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून व यानिमित्त मिठाई व फळ वाटप करून आनंद उत्सव साजरा करावा भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाची वैभवशाली परंपरा व गौरवशाली इतिहास या विषयावर चर्चासत्रे किंवा वर्च्युअल सभा आयोजित करून देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली विविध विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन सदरील पत्रकात करण्यात आलेले आहे
हे कार्यक्रम करत असताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत स्थापना दिवस साजरा करावा असे या पत्रकात म्हटले आहे.
पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी बरोबर कार्यकर्ते त्याच बरोबर बुथस्तरालावरील सर्वांनी हा उत्सव साजरा करण्याचे ही श्री लोणीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या उभारणीपासून ते आज पर्यंत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे या योगदानाचे स्मरण करीत सर्वोच्च पातळीवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा गौरव वाढवण्यासाठी आपण सर्वांनी स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे त्यांनी म्हटले आहे
===================================