खरीप हंगाम संपत आलाय तरी बँकेतून शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळेना,परतूरच्या स्टेट बँकेची शेतकर्‍यांना उडवाउडवी,बँकेतील कर्मचारी व गार्ड करतात शेतकर्‍यांना आरेरावीची भाषा**पीककर्जाचे प्रकरने तात्काळ निकाली काढा अन्यथा गाठ शिवसेनेशी- शहर प्रमुख दत्ता पाटील




परतूर(प्रतिनिधी)
चालु वर्षीचा खरीप हंगाम संपत आलाय तरी परतूर परिसरातील शेतकर्‍यांना अजुन स्टेट बँकत पीककर्जासाठी चकराच माराव्या लागत आहेत.कुठल्याना कुठल्या कारणावरून कर्मचारी कामचुकार पणा तसेच पीककर्जासाठी चालढकल करतांना दिसत आहेत.आॅगस्ट महिण्याची 10 तारीख उजडली तरी शेतकर्‍यांना पीककर्ज काही वाटप होतांना दिसत नाही किंवा अत्यंत संथ गतीने वाटप होत असून पिक कर्ज वाटपामध्ये अनियमीतता होत असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरूंग यांनी स्टेट बँकेच्या विभागिय कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.  निवेदनात प्रामुख्याने म्हटले आहे की शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चालु होऊन बरासा कालावधी उलटला तरी बँक काही ना काही कारणाने शेतकर्‍यांना पीककर्जासाठी वेठीस धरत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असतांना परतूरच्या भारतीय स्टेट बँक  मधून गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज मिळक नाही . त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून परतूर शाखेमध्ये शेतकरी हा दोन - दोन महिन्यापासून शेतीची कामे सोडुन बँकेत चकरा मारीत आहे . त्यांना पिक कर्ज मिळकत नाही व काही ऐजंट हे बँकेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन कामे करून घेत आहेत व सर्वसाधारण शेतकरी हा वारंवार चकरा मारतांना दिसतात. कर्मचारी सदर शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा वापरत आहेत व बँकेतील गार्ड हे शेतकऱ्यांना हिन व अपमानजनक वागणूक देवून दमदाटीची भाषा करतात .शेतकर्‍यांना गावात जाऊन पीककर्ज वाटपाचे शासनाचे आदेश असतांनाही कर्मचारी बँकेत येऊनही दोन दोन महिने पिक कर्ज मंजूर करत नाहीत. ऐजंटच्या मार्फत काही फाईली तात्काळ मंजूर करत आहेत . तरी संबंधीत कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा व पिक कर्ज जलद गतीने वाटप करावे , नसता शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात इशारा शिवसेना शहरप्रमुख दत्ता सुरूंग यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड