रायपुर रेल्वे गेटजवळील पुलाची दुरुस्ती करा; नसता रेल रोको आंदोलन करणार-रमेश भापकर


     
       परतुर(प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाकडुन रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 या रेल्वे गेटवर भूमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे. या दरम्यान सदरील पुलाचे काम बोगसरित्या करण्यात आले असुन यावेळी पूलाच्या आजु-बाजुने पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थित पर्यायी नालीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने या पुलाच्या खाली ५ फुटांपर्यंत पाणी जमा होत आहे.रायपुरसह इतर गावांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज सकाळी माजीमंत्री बबनराव लोणीकर,युवामोर्चा महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपच्या वतीने परतुर रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी रेल्वे प्रबंधकाला निवेदन सादर केले.त्यात सदरील पुलाची आठ दिवसात पुलाची दुरुस्ती करावी नसता भाजपच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी संपत टकले,शत्रुघ्न कणसे,अशोक बरकुले,शिवाजी पाईकराव,विष्णु बरकुले,उध्दव बरडे,डॉ.रविंद्र बरकुले,दत्तराव रायकर,प्रभाकर जाधव,तुकाराम मांटे,अशोक अंभोरे,उध्दव शेरे,सतिश सस्ते,पंडित आवटे,राजेभाऊ जगदाळे,गणेश हरकळ,हनुमान वाघमारे,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परतुर तालुक्यातील रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 जवळ रेल्वे गेटजवळ भुमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे.या पुलाच्याखाली पावसाळयाचे पाणी जमा होऊन
रायपुर,सिरसगाव,खांडवी, खांडवीवाडी, पिंप्रुळा रंगोपंत टाकळी व शेलगाव या अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. येथुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना या पुलाच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरुण प्रवास करावा लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रूग्णांना व महिलांना या पाण्यातुन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असुन रेल्वे प्रशासनाने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था करावी. सदरील ठिकाणीचे पाणी हे दुषित झाले असुन रायपुर गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने नागरीकांच्या जीवाशी न खेळता कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून आठ दिवसात या पुलाची दुरुस्ती करून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. नसता भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार