शिवसेनेच्या मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित राहा - मोहन अग्रवाल


परतूर (प्रतीनीधी): आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे करण्यात आले आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, रामेश्वर नळगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी केले. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख  बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम,सुदर्शन सोळंके, भगवानराव सुरुंग, विदुर जईद, दत्ता सुरुंग, अहेमद चाऊस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आगामी पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते,पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख अशोकराव आघाव, शहर प्रमुख विदुर जईद, दत्ता सुरुंग, युवासेनेचे अजय कदम, महिला आघाडीच्या कुंतीका भुसारे, युवसेना शहर प्रमुख सोनू भोकरे, राहुल कदम, दलित आघाडीचे मधुकर पाईकराव आदींनी केले आहे.                   चौकट - दरम्यान यावेळी मोहन अग्रवाल यांनी परतूर शहराच्या विकास कामाबाबत माहिती देतांना म्हटले पक्षाचा प्रमुख नेता व पालिकेत गटनेत्याची भूमिका बजावताना मी परतूर शहराच्या विकासासाठी माजी राज्य मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली, या पाठपुराव्यायाला यश मिळवत यातील पहिले 3 कोटीं रुपये मंजूर झाला असल्याची माहिती देत नाविन्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध  विकास कामांना प्रशासकीय 
मान्यता मिळाली असल्याची त्यांनी माहिती दिली   येत्या काही दिवसात या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे सांगत उर्वरित 2 कोटी मंजुरीच्या टप्यात असल्याचे ते म्हणाले, याबरोबर खा संजय जाधव व विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी शहराच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी दिला आहे असे एकूण 6 कोटी शहराच्या विकासासाठी मिळाले असल्याचे ते म्हणाले. शहराच्या विकासासाठी यापुढेही निधी उपलब्ध करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती