सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सासखेडा दूधा येथी टेनीस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न

तळणी (रवी पाटील)  सासखेडा दुधा येथील शिवशक्ती क्रिकेट क्लब यांच्या वतीने टेनिस बाँल वरील क्रिकेटचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धचे उदघाटन युवा ऊद्योजक शरद पाटील व मंठा नगरीची माजी नगराध्यक्ष्य  नितिन  राठोड याच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील खेळाडूना अशा स्पर्धच्या माध्यमातून आपली गुणवता सिध्द करण्यासाठी अशा स्पर्धचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत युवा उद्योजक शरद पाटील यानी व्यक्त केले ग्रामीण भागातील खेळाडूना शारीरीक व्यवस्था निट ठेवण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता असली तरी त्या साठी यञणा व मैदान असणे गरजेचे आहे शहराच्या ठिकाण च्या व्यवस्था जर ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या तर ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या खेळातील खेळाडूना गुणवत्ता असलेले खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतील असे मत यावेळी पाटील यानी व्यक्त केले 
यावेळी नितीन राठोड यानी सुध्दा आपले मत व्यक्त केले ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानी खेळासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे असल्याचे मत राठोड यानी व्यक्त केले या स्पर्धचे आयोजक दुधासासखेडा चे सरपच अजय जाधव ऊपसरंपचअरूण जाधव सतिश खूळे लखन जाधव संतोष जाधव आदी ग्रामस्थ ऊपस्थीत होते 

या स्पर्धचे प्रथम पारितोषंक २१००० 
द्वीतीय ११००० रूपये
तुतीय ५१००रूपया

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत