मंठा तालुक्यातील नायगाव येथे कायद्याविषयी शिबिरास गावकर्यांचा उस्फूर्त प्रतिसाद



मंठा(सुभाष वायाळ)दि.15 तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत मध्ये आजादी का अमृत महोत्सव 75  अंतर्गत  महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई च्या कायद्या विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीर ची सुरवात मंठा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय.श्री. ए.के.शर्मा साहेब,शासकीय वकील मुस्ताक शेख ॲड.संतोष देशमुख, ॲड.राजेश खरात, ॲड.ए. ए.कुलकर्णी,ॲड अजय वायाळ, ॲड.सोहेल पठाण,सरपंच गजानन फुपाटे, अविनाश राठोड, इतरांनी  पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण  करून करण्यात आले.
         कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालक दिनानिमित्त न्यायाधीश साहेबांनी लहान मुलाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
        न्यायाधीश साहेबांनी आपल्या भाषणामध्ये कायदा हा गरिबासाठी किंवा श्रीमंत साठी वेगळा नसतो.. तो सर्वांसाठी समान असतो,भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकार मधील  कलम 14 नुसार सर्वांना समान कायदा आहे, कलम पंधरा नुसार जातीचा भेदभाव करता येणार नाही, कलम 16 नुसार सर्वांना समान शासकीय नोकरीची संधी आहे, कलम 19 नुसार  स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, कलम 25 नुसार विविधते मध्ये एकता आहे, त्याचप्रमाणे सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी तडजोडीने गावातील वाद मिटवता येतील, पुन्हा त्यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई विषयी माहिती दिली.,
    कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये उपसरपंच अविनाश राठोड नायगावचा लोखंजोखा मांडला. कार्यक्रम पार पाडण्यात, पोलीस पाटील नारायण फुपाटे,ग्रामसेवक बी एस गवळी, मुख्याध्यापक  एस व्ही.जायभाय  आणि नंदकिशोर साबू, शिक्षक व्ही एस.दुभळकर  आणि एस. बी.घुगे, ग्रामसेवक राहुल सूर्यवंशी, इतर उपस्थित होते.
     या शिबिराचे आयोजन ॲड,संतोष देशमुख,  सरपंच गजानन फुपाटे, उपसरपंच अविनाश राठोड यांनी केले होते.,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक.एस. व्ही.जायभाय यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. संतोष देशमुख  यांनी केले.

चौकट --
कोरोणा मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे माननीय श्री.न्यायाधीश ए.के.शर्मा  साहेबांनी सरपंच गजानन फुपाटे आणि उपसरपंच अविनाश राठोड यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.


Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात