सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भरधाव वेगाने चालणाऱ्या दोन वाहनावर मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख याची कारवाई



तळणी (रवी पाटील) तळणी मंठा रोडवरील पोस्टे मंठा अतर्गत दुरक्षेञ तळणी याच्या हद्दीत भरधाव वेगाने व निष्काळजीपनाने गाडी चालवणाऱ्या  आनंद भंगवान कागंणे ( वय ३४ )चालक रा कांगणेवाडी ता अंबेजोगाई जि बिड याच्यावर कलम २७९ भादवी सहकलम १३४ १७७ १८४ मोटार वाहन कायद्या नुसार पोना सुभाष राठोड याच्या फिर्यादीने हा  गुन्हा दाखल करण्यात आला सदर वाहनाच्या पासीग क्रंमाकात खोडातोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच या वाहनामध्ये मानवी जीवीतास धोकादायक असलेली थर्मल पावडरची निष्काळजीपणे वाहतुक करताना दिसुन आले सदर थर्मल पावडरची वाहतूक करण्याची कुठलीच परवानगी  नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले असुन संबंधीत गुन्हयाचा तपास सुभाष राठोड हे करत असुन दुसऱ्या वाहनावरी शेख लतिफ शेख बशीर वय( ४७ ) रा देव पेठ बालाजी मंदीर वाशीम याच्यावर सुध्दा कलम २७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास संदीप घोडके याच्या कडे देन्यात आला आहेया दोनही वाहनाला व वाहनचालकाना कोर्टात हजर केले असता दंडात्मक कारवाई कोर्टाकडून  करण्यात आली आहे मंठा तळणी रोडवर वाहनांच्या किरकोळ अपघात्ताच्या संख्येत वाढ झाली आहे सिमेन्ट रस्ता पूर्ण झाल्यापासून या रोडवरील वाहनांची वाहतूकीची संख्या वाढली आहे शेगाव पंढरपूर रोडवरील मंठा पो स्टेशन हद्दीतील प्रत्येक बीट ला भरधाव जाणाऱ्या वाहनांना कारवाई करण्याची सुचना मंठा पो निरीक्षक संजय देशमुख यांनी दिल्या आहे या कारवाई वेळेस पोलीस नायक सुभाष राठोड संदीप घोडके व इतर पोलीस कर्मचारी हजर होते ही कारवाई रविवारी संध्यांकाळी करण्यात आली आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत