वाघाळा येथील अंखंड हरीनाम सप्ताह , सहाव्या दिवशीचे हरी कीर्तन सेवा मुक्ताबाई संस्थानचे मठाधिपती ह भ प विशाल महाराज खोले

तळणी(रवी पाटील) येथून जवळच असलेल्या वाघाळा येथील अंखंड हरीनाम सप्ताह मधील सहाव्या दिवशीचे हरी कीर्तन सेवा  मुक्ताबाई संस्थानचे मठाधिपती ह भ प विशाल महाराज खोले यांची झाली 

अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा ॥१ ॥

न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे 

या जगदगुरू तुकाराम महाराज्या अंभ गावर सुंदर निरूपण केले मनुष्याच्या आयुष्यात योग्य ठिकाणी घडलेले जिवनाचे अनुसरण घंडल्यानंतर मिळणारा प्रसाद काय मिळू शकतो यांच चितंन महारांजांनी या अभगातुन व्यक्त केले आहे मनुष्याच्या आयुष्यात अनुसरण किती फलदायी  असू शकते याची कारणीमीमांसा महाराजानी या ठिकाणी व्यक्त केली आहे मृत्यू लोकांच्या प्रवासाबाबतचे धोरणात्मक धोरण यातून महाराजांनी व्यक्त केले प्रत्येक मानवाला मरण हे अटळ आहे मृत्यू लोकात मनुष्याला मरणाची तारीख वेळ माहीती नसली तरी ते अटळ आहे कारण मुत्युलोकात कोणीही अमर राहू शकत नाही मूत्यू लोक सोडण्याचे अनेक दरवाजे आहेत काहीनी हत्येने मूत्यूलोक सोडला  तर काही नी आत्महत्येने सोडला काही नी अकाली काहीनी कालमरणानी तर काहीनी आत्म त्यागानी काहीनी समर्पनानी तो सोडला आहे साधुंसंतांनी समाधीने हा मुत्यु लोक सोडला आहे मृत्यू लोक सोडण्याची मोठी यादी आहे ज्यानी आत्महत्येनी मूत्यू लोक स्वीकारला अशाची मोठी संख्या वाढतच असून ती देव देश आणि धर्म जपणाऱ्या देशाला शोभत नाही विस पचं वीस वर्षा पूर्वीचा काळ व आताचा काळा यामध्ये खूप फरक आहे पूर्वी अपमानीत झालेल्या कृंटूबात द्रारी द्रयाने व्याकूळ कर्जबाजारीपणामुळे ञस्त असलेल्या घरात आत्महत्येतेचे प्रकार घडायचे परतू ते लोण आता सुशिक्षीत घरात सुध्दा दिसत आहे ज्या देशामध्ये नाव कमवण्यासाठी  सद्यस्थीतीत पैसे खर्च कारावे लागतात आधीच्या काळात ही परिस्थीती नव्हती सहज पैसे जवळ आले सहज लिलया क्रिया चालू असली की मनुष्याच होत होत आता नाव होण्यासाठी सुधा जाहीरातीचे माध्यम स्वीकारावे लागात आहे आधीच्या काळात सिनेमा चालाव म्हणुन जाहीरातीचा आधार घ्यावा लागत असे आता परिस्थीती बदली आहे आता जाहीरातीच्या आधारावर सगळे चालत आहे हे सगळे विश्वच जाहीरातीचे झाले असले आपल्याला हवे असेल तेच जर त्यातून स्वीकारले तर विकृती निर्माण होणार नाही 

आताच्या काळात माध्यम प्रसीध्दी  करण्यासाठी आली आहेत जिथे पैसे खर्च करावे लागतात त्या देशामध्ये सतत प्रसिद्धीच्या झोतात भरपूर पैसा असलेला अभिनेता आत्महत्या ही या देशाची मोठी शोकांतीका आहे देव देश धर्माचे आचरण करण्याची आपली . हिन्दूंची  संस्कृती आहे ती जोपासणे खूप गरजेचे आहे आज काल मुंलीवर संस्कार करणे गरजेचे काँलेजमध्यल्या गँदरीग मध्ये तोकडया कपडयात नाचण्याची परवानगी आई वडील कशी काय देऊ शकतात मुंलीना नाचवून शिक्षकांना काय साध्य करायचे खर तर शिक्षकांची भूमीका ही मुलांवर सस्कांर करण्याची असली पाहीजे त्याना कसे घडवायचे याचे धोरण शिक्षकानी राबविले पाहीजे 

आपल्या सत रुषीनी साधुनी घालून दीलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे संत महात्मे अमर झाले आहेत संत गेल्यावर . सुध्दा ते आपल्याला प्रेरणा ऊर्जा  देऊन जात असतात तीच प्रेरणा मनुष्याने स्वीकारली पाहीजे संत मुनीजन जरी गेले असले तरी आपल्या साठी ज्ञान कीर्ती आणि समाधी जगामध्ये ठेवून गेले आहेत या अमरत्वाची व्याख्याच जगदगूरु तुकाराम महाराज यांनी या अंभगातून व्यक्त केली आहे ती त्याच्या नजरेत आली अमरत्व प्राप्त करायचे असेल तर ते कोणाला मिळेल जो अनुसरे  करणाऱ्या लाच प्राप्त होईल मनुष्याला समजले पाहीजे की आपण आहोत कोठे यापेक्षा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणावर कायम असलो पाहीजे तरच आपला आदर समाज करेल 


बाह्यरंगातून स्वीकारले जाते ते अनुकरण आणि अंतरंगातुन स्वीकारले जाते ते अनुसरण महत्वाचे आहे दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होऊ शकत नाही त्यासाठी त्याग निष्ठा समर्पन या गोष्टी ची जोड आवश्यक आहे आयुष्याची पन्नास वर्ष घोडयावर गेले रात्रीचा दिवस केला तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली दुसऱ्याना शिव्या देऊन छञपती होता येत नाही त्यासाठी अनुकरण महत्वाचे आहे अनुसरण आणिअनुकरण यामध्ये फरक आहे महारां जांनी सांगीतल्या प्रमाणे अनुसरण हे भक्ती व ज्ञानामध्ये घडत असते किवा कर्मामध्ये घडत असते भक्ती मध्ये घडलेले अनुसरण हे संतांच्या ठिकाणी दिसून येते तर ज्ञानामध्ये अनुसरण घडायला पाहीजे अपरिहार्य कारणामुळे ज्ञानात अंहकार झाल्यामुळे कधी कधी अनुसरण घडत नाही ज्ञानाचा कलेचा पांडीत्याचा आणि मानमरबतेच्या आपल्या जवळ असलेल्या मालमत्तेचा पैशाचा असलेला अंहकार अनुसरणामध्ये होऊ देत नाही ज्याला मोठे व्हायचे असेल त्याने छोट होऊन जगा एक दीवस नक्कीच तुमचा उध्दार झाल्याशिवाय राहनार नाही 

सप्ताह मध्ये  निमित्य वाघाळा गावातील सर्व तरूण वडीलधारी माणसे नियोजन करीत असून संत नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षांण संस्थेचे विद्यार्थी साथ सगंत देत आहे

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश