सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा येथे आगळी-वेगळी भाऊबीज, कोरोना ने मयत झालेल्या शेतकरी कुटुंबासोबत केली साजरी


मंठा-(सुभाष वायाळ).8 मंठा तालुक्यातील कोरोना महामारीत मयत झालेल्या कर्त्या शेतकरी कुटुंबासोबत मा.मंत्री आ.बबणराव लोणीकर साहेब व राहुल भैय्या लोणीकर यांच्या सुचणेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती राजेश मोरे यांनी आगळीवेगळी भाऊबीज साजरी केली.
       कोरोना महामारीने एकंदरीत माणवाची,जगाची व देशाच्या जिवणपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे , मानसांत मानुस राहीला नसतांना या गोष्टीला कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती राजेश मोरे अपवाद आहेत त्यांनी मा.मंत्री आ.बबणराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांच्या सुचणेनुसार कोरोना महामारीत स्वतः ची तमा न बाळगता शेकडो पेशंटला भेटूण धिर तर दिलाच शिवाय पहील्या कडक लाॅकडाऊण मध्ये त्याच्यासह मित्रपरिवाराने पायी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला अन्नदान केले त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले.नुकतीच झालेले रक्षाबंधन कार्यक्रम सूद्धा त्यांनी कोरोना मुळे मयत झालेल्या परीवारासोबत साजरे केले होते जगनराव काकडे मा.उपसरपंच विवेक काकडे, श्यामराव काकडे ,महेशराव काकडे ग्रामपंचायत सदस्य, निवृत्ती सस्ते ज्ञानेश्वरपंत काकडे , आदिनाथराव काकडे ,रामभाऊ काकडे विष्णुपंत काकडे ,एकनाथ काकडे, पवनजी काकडे

Comments