परतूर येथील प्रभाग क्रमांक 10 मधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश


परतूर(हनूमान दंवडे)
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परतुर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील अनेक युवकांनी  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
    यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी या युवकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशित केले यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी भाजपाचा शेला देऊन स्वागत केले
     यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असून भारताला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विकासाचा अजेंडा घेऊन चालणारा कार्यकर्ता असून जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्वाची शिकवण व जोपासना करणारा हा पक्ष असल्याचे प्रतिपादन यावेळी राहुल लोणीकर यांनी केले
  पुढे राहुल लोणीकर म्हणाले की परतूर विधानसभा मतदार संघामध्ये युवकांची मजबूत फळी पक्षाकडे असून परतूर शहरात ही पक्षाने कात टाकलेली आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढलेला असून यापुढे शहरातील असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असेही ते म्हणाले
यावेळी भाजपाचे युवा कार्यकर्ते नरेश कांबळे यांची उपस्थिती होती 
   या वेळी ,नरेश सोनवणे,संतोष कदम,रणदीपसिंह जुनी, करतारसिंह पटवा,विजय ससाळे
राहुल साठे,श्याम सुतार,नयुम पठाण,राहुल थोरात, कुमार लांडगे,राम लोखंडे,अक्षय नाथभाजन,सचिन साळवे,प्रशांत साळवे, अशोक ठोंबरे,प्रेम हिवाळे
प्रदिप सुतार,सागर कांबळे, अभिषेक थोरात,गौरव गायकवाड
सद्दाम शेख,विकास बासनवाळ आदींनी भाजपा मध्ये प्रवेश केला

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड