मंठा महा.विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार,नागरीक त्रस्त


 मंठा(सुभाष वायाळ)मंठा महा. विज वितरण कंपनी मंठा शहरातील व खेड्यातील त्यांना हवे तेव्हा शहरातील व खेड्यातील वीज पुरवठा खंडित करतात. दिनांक 13 वार सोमवार रोजी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.ते वीज पुरवठा खंडित करत असताना कुठल्याही प्रकारची नागरिकांना व व्यवसायिकांना पूर्वसूचना देत नाहीत. त्यामुळे विज वर अवलंबून असणाऱ्या  छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन   त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. व मोठ्या व्यवसायिकांना वीज वर अवलंबून असणारे व्यवसाय त्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आज जवळपास सर्वच व्यवसाय हे विजेवर अवलंबून आहेत. त्या सर्वांना तोटा सहन करावा लागत आहे. व अत्यावश्यक सेवा मध्ये असणारी सर्व क्षेत्रांना सुद्धा वीज पुरवठा खंडित चा परिणाम होत आहे. घरगुती वीज वापरणाऱ्यानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे वीज पुरवठा खंडित करत असताना नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे पूर्वसूचना न दिल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अभियंता यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत