तळणी परीसरात तुरीच्या पीकाच्या तुऱ्हाटया झाल्या

              तळणि (रवी पाटील) खरीप हंगामातील तुरीचे पीक ऊभे वाळत आहे. काढणीच्या अवस्थेत असणारे तुर वाळत असल्याने शेतकरी चिंता ग्रस्त आहेत. मोठया प्रमाणावर तुर वाळण्याचे प्रमाण असल्याने ऊत्पादनात मोठी घट होणार आहे.तुरीच्या पीकाच्या तुऱ्हाटया झाल्या आहेत.आधीच आर्थीक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत जास्तीची भर पडणार आहे. खरीप हंगामातील नगदी पीक म्हणुन ओळखले जाणारे तुर पीक आंतरपीक म्हणुन ओळखले जाते. अतिवृष्टीच्या तडाख्यातुन वाचलेले तुरीचे पीक फुले व शेंगानी बहरून जोमात आले  होते. सध्या परीपक्व अवस्थेतील पीक काढणीस आले आहे. परंतु विवीध प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या प्रार्दुभावामुळे तुरीच्या झाडण्या झाल्या आहेत. या वर्षी शेतकऱ्यांना तुर विक्रीसाठी मिळण्याची शक्यता कमीच आहे.जे ऊत्पादन होणार आहे. ते घरी दाळ खाण्यासाठी वापरावे लागणारे उत्पादन आहे खरीप हंगामातील सोयाबीणच्या उत्पादनानंतर जास्तीचे उत्पन म्हणून तुर या पीकांकडे बघीतले जाते माञ या वर्षी या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकर्याना याचा आर्थीक फटका बसणार आहे या वर्षीच्या सोयाबीण पीकांला अतिवृष्टीचा फटका  बसलेला असताना एकाच हंगामातील दुसऱ्या पिकाला बसलेला निसर्गाच्या लहरीपणाचा हा दुसरा फटका असल्याने शेतकर्याचे आर्थीक गणित विचकले आहे तुर या पिकांचा सर्वाधिक जास्त फटका हा कोरडवाहु शेती कणाऱ्या शेतकर्याना बसला आहे ऐरवी तुर पिकांला एक कीवा दोन कीटकनाशकाच्या फवारणी केल्यावर तुरीचे उत्पादन शेतकर्याना मोठया प्रमाणात मिळत असते पंरतू या वर्षी कीटकनाशकाची अतिरीक्त फवारणी करुन सुध्दा तुर पिकांचे मोठे नुकसान झाले 

रब्बी हंगामातील मुख्य पिक असलेले  हरभरा या पिकांला सुद्धा सततच्या ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादूर्भाव झाला आहे पावसाळा संपल्या पासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा ची झाडे पिवळे पडून जळत आहेत परतीच्या पावसाने रब्बी हंगामाच्या पेरण्या . या वर्षी उशीरा झाल्याने रब्बी हंगामांतील शाळू गहू हरभरा यांची वाढ खुंटली असून रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्याना पिक सुरक्षीत ठेवण्यासाठी शिल्लकचा खर्च करावा लागत असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होऊन शेतकर्यावर आर्थीक संकटाचा सामना करण्याची वेळ या वर्षी दोनही हंगामात आली आहे 

कृषी विभागाचे या समस्या कडे दुर्लक्ष होत असुन खरीप तर गेलाच आहे हवामान बदला नुसार शेतकर्याना मार्गदर्शन होने गरजेचे असताना सुद्धा तसे होताना दिसत नाही एखाद्या

मागच्या हंगामाच्या पिक विम्यांच्या सदर्भातील शेतकर्याना आलेल्या वाईट अनुभवा मुळे व किचकट प्रक्रीयेमुळे रब्बी  पिक विमा भरण्या  सदर्भात शेतकरी उदासीन असल्याने पिक विमा सरक्षीत करण्याचा कल कमी दीसतो आहे 


सोयाबीण पिकांच्या नुकसानी बरोबर तुर उबळण्याचे प्रमाण सुध्दा या वर्षी जास्त आहे त्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थीक समस्येचे नियोजन शेतकर्याना करावे लागत आहे 
गौतम रणमळे शेतकरी तळणी

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड