दत्त जयंती निमित्त गिरगावकर महाराजांचे किर्तन
परतूर : (प्रतीनीधी)तालुक्यातील हरेराम नगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्त जयंती निमित्त दी१८-१२-२०२१ रोजी वार शनिवारी सकाळी १०:३० वाजता बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केले आहे.
रामराव कणसे यांनी १९५८मध्ये हरेराम नगर येथील सुरु केलेल्या दत्त जयंती उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून आता पर्यंत अनेक मान्यवर किर्तनकरांनी या उत्सवात आपली कीर्तन सेवा दिली आहे. हरेराम नगर येथील कणसे कुटुंबीयांकडे या उत्सवाचे यजमान पद आहे.
दत्त जयंतीला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर कोरोना विषयक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कणसे यांनी केले आहे.