कानडी येथे चालू असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्य चालू असलेल्या अंखंड हरिनाम सप्ताह ची सांगता आज ह भ प बापूराव महाराज परतूकरकरांच्या काल्याच्या किर्तनाने



तळणि (रवी पाटील)येथुन जवळच असलेल्या कानडी येथे कार्तीकी एकादशि निमित्त सप्ताहाच्या सांगता प्रसंगि बापूराव महाराज परतूरकर यांनी काल्याचे किर्तीन करते वेळेस सांगितलेज्ञानीयाचा राजा गुरु महाराव म्हणतील ज्ञानदेव तुम्हा ऐसे*
या जगद गूरू तुकाराम महाराज यांच्या अंभगावर  वास्तव निरूपण केले मनुष्या च्या जीवनातील संत सहवास आवश्यक आहे त्यानी घालून दीलेल्या मार्गावर चालणे हे मनुष्यासाठी  हीत कारक असुन संताचे अनुकरण मनुष्याने स्वीकारले पाहीजे त्यांनी दाखवून दिलेला भक्ती मार्गावर आपण मार्गक्रमण केले तर मनुष्य जीवाचे जीवन सार्थक झारच्याशिवाय राहणार नाही असे प्रातिपादन ह भ प बापूराव महाराज परतूकऱ यांनी कानडी येथे काल्याच्या किर्तन प्रसंगी केले  मनुष्य जीवनातील संत सहवास हा सत्याचा मार्ग आहे तो स्वीकारणे म्हणजेच तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे  संतांनी सागितलेल बोललेल स्वीकारल पाहीजे 

संतांचे बोलणे हे अंभग असते त्याला कधीच भंग नसतो त्याच्या बोलण्याने कधीच नाश होत नसतो पंरतू मनुष्याच्या बोलण्याने भंग होतो कारण आपल म्हण हे मुर्दाड आहे तर चित्त विचलीत म्हणून मनुष्याच्या आयुष्यातील बोलणे हे व्यर्थ आहे म्हणून मनुष्याच्या जीवनातील बोलने व्यर्थ आहे मनुष्याला आपल्या बोलण्याचे मर्म समजला तर तो पूरुषार्थ ठरेल तसे होत नसल्याने संसारीक आयुष्यात मानसाला यश येत नाही मनुष्य करत असलेला संसार खोटा आहे तोच खोटा संसंराला मनुष्य भक्ती मार्गापेक्षाही श्रेष्ठ समजत असल्याने भक्ती साधना कमी पडत आहे म्हणून संसारात कोन्हीही सुखी नाही कारण खोट्या संसारात सगळे गुरफटले असल्याने परमार्थाक विषयाची गोडी मनुष्यला राहीली नाही आणि तीच गोडी स्वीकारायची असेल तर भक्ती मार्गाशीवाय पर्याय नाही जो पर्याय संतांनी ज्ञानोबा तुकोबा नी स्वीकारला तो तुम्ही आम्ही स्वीकारायला हरकत काय आहे 

मनुष्याने केलेल्या कर्माची फळ येथेच भोगायची आहे त्यासाठी चांगले कर्म करा भक्ती परमार्थ करून आयुष्याचे सार्थक करून घ्या हा जन्म. पून्हा मिळेल याची शाश्वती नाही जीवाला मरण नसले तरी शरीराला मरण हे नक्कीच असते जीवामुळेच मनुष्याच्या शरीराराला किमंत असते तो जीव आपल्याला दिसत नसला  तरी त्याला महत्त्व आहे जसा श्वास दीसत नाही तसा देव पण दीसत नाही गरज आहे त्याला भक्ती भावाने आळवण्याची तो बरोबर प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही असे महाराजानी शेवटी सांगितले 

काल्याच्या किर्तनासाठी श्री नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यानी सांथ संगत केली तर कानडी ग्रामस्थानी चोख व्यवस्था पार पाडली महाप्रसादाने या सप्ताहची सांगता झाली

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....