कोरोना प्रतिबंध लसीकरणात मंठा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंठा आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज


 मंठा (सुभाष वायाळ) कोरोना या महाभयंकर रोगाने जगभर गेली दोन वर्ष झाले हा -हा कार माजवला आहे. कोरोना च्या  आलेल्या दोन लाटेमुळे अनेक लोकांचा रोजगार तर गेलाच तर काहीजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व ओमायक्रोनच्या रूपात तिसरी लाट येते का, यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना या रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेगवेगळे उपाय अवलंबिले यामध्ये स्वच्छता, लॉक डाऊन, वैद्यकीय उपचार, व त्यानंतर कोरोना प्रतिबंध म्हणून  लसीकरण हाच एकमेव उपाय समजून शासनाने लसीकरनणाला सुरुवात केली.लसीकरणासाठी शासनाचे दररोज करोडो रुपये खर्च होत आहेत. परंतु मंठा तालुक्यातील आरोग्य विभाग पाहिजे तेवढा जागृत झाल्याचा दिसून येत नाही.यामध्ये त्यांचा नाकर्तेपणा म्हणा किंवा नियोजनाचा अभाव या अशा ढसाळ कारभार पणामुळे मंठा तालुक्याचे लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मंठा केंद्र एकूण  व तालुक्या अंतर्गत लसीकरणाचे एकूण 04 उपकेंद्र आहेत.पाटोदा, ढोकसाळ, दहिफळ खंदारे व तळणी यामध्ये येणारी एकूण लोकसंख्या एक लाख 91हजार 489 आहे. तर अठरा वर्षावरील लाभार्थीची संख्याही एकूण एक लाख 40 हजार 706 आहे. यामध्ये मतदार यादीनुसार 18 वर्षावरील एकूण लाभार्थींची संख्या ही 1 लाख 24 हजार 713 आहे.यामध्ये आतापर्यंत एकूण पहिला डोस 95 हजार 978 एवढे प्रमाण आहे. तर दुसरा डोस42 हजार 598 एवढे प्रमाण आहे. दुसरा डोस ची टक्केवारी पाहिले असता एकदम अत्यल्प म्हणजेच 30 टक्के आहे. यामध्ये अत्यल्प दुसरा डोस ची टक्केवारी ही ढोकसाळ उपकेंद्राची आहे एकूण 28 टक्के आहे.  ज्यावेळेस कोरोनाचा  दुसरा डोस घेतला जाईल. त्याच वेळेस कोरोना आटोक्यात येईल. व नागरिकांना पूर्णपणे कोरोणा पासून संरक्षण मिळेल. व पूर्ण लसीकरण झाले असे म्हणता येईल. या मध्ये स्थलांतराची संख्याही 21 हजार 495 आहे. तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांचे सानुग्रह निधीसाठी फक्त 35 अर्ज आले आहे. अशा या परिस्थितीमध्ये दुर्दैवाने तालुक्यामध्ये कोरोना चा शिरकाव झाला तर या परिस्थितीला सर्वस्व आरोग्य विभाग जबाबदार राहील. यामुळे  आरोग्य विभागाने लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. व संबंधित वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष द्यावे.अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले