शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची मंठा जिनिंग मालकाकडून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट


 मंठा (सुभाष वायाळ)मंठा तालुक्यामध्ये चार खाजगी कापूस खरेदी जिनिंग आहेत. या सर्व जिनिंग मध्ये शेतकऱ्यांनी काबाडकष्ट व अहोरात्र मेहनत करून पिकवलेले शेतकर्‍याचं पांढर सोन म्हणजेच अर्थात कापूस हा कवडीमोल किमतीमध्ये खरेदी केला जात आहे. या खाजगी कापूस खरेदी जिनिंग मालकांची  परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एवढी मोठी दहशत निर्माण झाली आहे की त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासही कोणीही पुढे येईना.याची कारणेही अनेक आहेत यामध्ये शेतकऱ्याचा अडाणीपणा म्हणा किंवा नाहक त्रास महणा परत आणखी एक कारण आहे की शेतकऱ्याचा कापूस  खरेदी केल्यानंतर नगदी रक्कम घ्यायची असेल तर शेकडा दोन ते तीन रुपये कमी दिले जातात. व चेकद्वारे रक्कम घ्यायची असेल तर  पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु याही गोष्टीला सामान्य शेतकऱ्यासाठी तीन ते चार महिने लागतात. मंठा तालुक्यातील जिनिंग  मधील कापसाचे दर आणि शेजारील तालुक्यातील कापसाचे दररोजचे दर पाहिले असता  कापसाचे 1 नंबर, 2 नंबर,3 नंबर अनुक्रमे 800 रुपये, 500 रुपये, 300 एवढा मोठा फरक भावा मध्ये दिसून येत आहे. व एवढ्या मोठ्या कमी फरकाने मंठा खासगी जिनिंग मालकाकडून कापूस खरेदी केला जात आहे. उदाहरणार्थ परतूर व सेलू येथील कापसाचा भाव आठ हजार सहाशे रुपये असेल तर मंठा जिनिंग मध्ये आठ हजार रुपये किंवा आठ हजार शंभर रुपये असतो. मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी असे समजायचेका की, मंठा तालुक्यातील कापूस हा निकृष्ट दर्जेचा आहे. असे असले तरी हाच कापुस शेजारील तालुक्यामध्ये नेला तर चांगला भाव मिळतो. अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक  व अडवणूक केली जात आहे. तरी संबंधित विभागाने यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी व शेतकर्‍यांना योग्य न्याय द्यावा. अशा रीतीने शेतकऱ्याची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. ही लूट थांबवावी.अशी शेतकऱ्याची दबक्या आवाजा मध्ये चर्चा आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत