तळणी येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता

तळणी (रवी पाटील)येथील दत्त जयंती निमित्य चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह ची सांगता ह भ प लक्ष्मीकांत महाराज सेवलीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने .झाली तळणी येथील दत्त जयंती उत्सवाला गेल्या ७० वर्षापासूनची पंरपरा सेवलीकर महाराजाच्या किर्तनरूपी सेवेने आजतागायत सूरूच आहे या सात दिवसात रोज सकाळी  रामदासी भिक्षा दत्ताञयाचे नित्योपचार आरती नैवेद्य व मानाची पंगत असलेल्या एका भक्ताकडून अन्नदानाची प्रथा गेल्या ७० वर्षापासून पेक्षा जास्त काळापासून सुरूच आहे दत्त जयंती निमित्य श्री विठ्ठल मंदीर येथे सात दीवस हरदासी किर्तनाची सेवा सेवलीकर महांराजांच्या वतीने होत असते त्यांनंतर भोलेनाथ महाराज स्थापीत श्री दत्त मंदीर पुर्णा भोलेनाथा गड येथे सुध्दा गेल्या चाळीस वर्षापासून काल्याच्या किर्तनाची पंरपरा कायम आहे 

या काल्याच्या .निमित्याने जगदगूरू तुकाराम महाराज यांच्या *उपजोनिया पुढती येऊ काला खाऊं दहीभात* ॥१॥
*वैकूठी तो ऐसे नाही*
*कवळ काही काल्याचे* II ध्रू॥
*एकमेका देऊमुखी* I
*सुखी घालू हुबंरी* II २॥ 
*तुका म्हणे वाळवंट* I
*बरवे नीट उत्तम* ll ३॥
या अभंगावर सुंदर निरुपण केले भगवान श्रीकृष्णाने  आपल्याला या काल्याची पंरपरा निर्माण करू दीली आहे ती एक प्रकारची भगवंता प्रती असलेली भक्तीच आहे भक्ती साधनाच मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा मार्ग निर्माण करू शकतात पण त्या भक्ती साधनेत भंगवता कडून जर काही अपेक्षा ठेवली नाही तर तो अपेक्षेपेक्षाही जास्त देणारच यात शंका नाही मनुष्याने केलेली निस्वार्थ भक्ती साधना ही त्या मनुष्याला नक्कीच भगवत प्राप्तीसाठी उपयोगी पडेल पण यासाठी सांसारीक मोह माया यापासून त्याला दुरच राहावे लागेल तर त्या भक्ती साधनेला जास्त महत्व प्राप्त होईल संसारीक आयुष्यातील भक्ती साधना मध्ये स्वार्थ असल्या कारनाने ती साधना भंगवतां प्रिय नसते 

जगदगूरू तुकाराम महाराज यांच्या भक्ती साधनेचा आदर्श मनुष्याने थोडाफार घेतला पाहीजे संसारीक सुख  विषयांचा त्याग करून भक्ती साधनेला महत्व दीले व इश्वर प्राप्त झाला असल्याने त्याना वैकुठ प्राप्त झाले कठोर भक्ती मार्ग स्वीकारल्याने त्याचे फळ काय असू शकते यांचे उदाहरण म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आहेत स्वच्छ आचरण व भंगवंता प्रती असलेला  निस्वार्थ भक्ती भावामुळेच  त्याना देवत्व प्राप्त झाले आहे  म्हणूनच आज आपण त्याच्या नतमस्तक होत ऊसतो 

कृष्ण चरित्र 
भगवान कृष्णाचे चरित्र हे त्यागाचे चरिञ आहे सदैव धर्माची खरी बाजू काय असते हे दाखवण्याचे काम हे कृष्ण चरिञ करीत असते देवाने संव गडया सोबत येऊन केलेला काला मनुष्य जन्मात तुम्हा आम्हाला प्राप्त होतो म्हणजे आपण खरोखरच भाग्यवान आहोत देवाने पुढाकार घेऊन संवंगड्याना केलेले बोबडे उपदेश त्या संवगड्याना अमरत्व जर प्राप्त करून देऊ शकते तर तो काला तुम्ही आम्ही सेवन करायला हरकत काय आहे या काल्याचे अनन्यसाधारण महत्व असून मनुष्य जीवनातील सांसारिक काल्यापेक्षा भक्ती मार्गाने महत्त्व असलेला काला किती तरी पट्टीने श्रेष्ठ असून मनुष्याने तो स्वीकारला पाहीजे कारण भूतला वरचा हा काला वैकूठात सुध्दा नाही म्हणून त्याला महत्व आहे संतानी काल्याचा आदर्श घालून दीला आहे वाळवटांतील काला घेण्यासाठी देवाला सुध्दा अनेक रूपांमध्ये भूतलावर येण्याचा मोह आवरत नाही असा हा उत्तम काला मनुष्य जीवाला प्राप्त झाला असल्याने तो काला प्रत्येकाने जर स्वीकारला तर आत्मीक समाधान मनुष्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही 
श्रीकृष्ण परमात्माला गाईचा फार लळा असायचा देवाची गाई फार निष्ठा असायची त्याच गाईना आपण आज संकटात टाकले आहे तीला कसायाच्या दावणीला बांधू नका सांभाळ होत नसेल तर गोरगरीबाला दान देऊन टाका गोशाळेला देऊन टाका तिच्यावर आपणच संकट आनत आहोत जो गाईला ञास देईल त्याला नक्कीच नरक यातना झाल्याशिवाय राहणार नाही शक्यतोवर तिचा सांभाळ करा तुम्हाला ती नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असे महाराजांनी सांगीतले 

या उत्सवासाठी विठ्ठल कोरकणे अंबादास भावसार कल्याण जोशी बाळू पाटील योगेश पाटील नदू पाटील माधवराव सरकटे आदी भक्त मडळीनी परीश्रम केले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती