माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून तळणि येथे दोन दिवसीय सप्ताहाची सांगता

मंठा(रवी पाटील)तालुक्यातील तळणी येथे संत शिरोमणी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून माऊली ज्ञानेश्वर महाराज मंदीर येथे दोन दीवसीय सप्ताह ची सांगंता आज ब्रम्हचारी ह भ प सुधाकर शास्त्री मुळे याच्या काल्याच्या किर्तनाने झाली संत नामदेव महाराज यांच्या *अष्टोत्तर शे वेळ समाधि निश्र्चळ पूर्वी माझी स्थळ वहनाखाली ॥१॥ उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची* या अभंगावर निरुपण केले या समाधी सोहळ्याच्या निमित्याने माऊलीच्या अधिकाराविषयी महारiजानी उपस्थीताना मञमुग्ध केले ज्ञानोबारायाचे सामर्थ्य हे ज्ञानोबारायाकडेच होते माऊली कडे जात असताना थोडासा विचार करून गेले पाहिजे कारण कुठलीही गोष्ट करत असताना ती अधिकार सपन्न होऊन केली तर तिचे फळ निश्चत मिळते आणि तिच गोष्ट जर आपण अधिकार सपन्न होऊन केली नाही तर तिचे फळ मिळत नाही सध्याचे वारकरी खरोखरच भाग्यवान आहेत की आपल्याला जीवंत संतांचा सहवास लाभला आहे त्याचे नामस्मरण करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे भगवान ज्ञानोबाराय यांची समाधी आणि जगदगुरू तुकाराम महाराज सदैव वैकूठ गमन या दोनही संताचा सध्याचा सहवास या पृथ्वीतलावर जीवंत आहे म्हणून जीवंत संताचा सहवास व नामस्मरण करणारा वारकरी सप्रदाय भाग्यवान आहे ज्या ज्ञानोबारायाचां समाधी सोहळा आपण साजरा करतो त्याच ज्ञानोबारायांची ऊंची खूप मोठी आहे त्याचा दरबार मोठा आहे माऊली कडे गेल्यावर त्यानी कधीच लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेद केला नाही माऊली कडे जाणारा सगळे सारखेच वास्तवीक पाहता जर वेदांत शास्ञ शिकायचे असेल तर त्याला अधिकारी  लागतो विवेक वैराग्य क्षमाधीस्त संपत्ती पाहीजे मुमूक्षत्व पाहीजे या सर्व गोष्टी वेदातामध्ये पाहीजे पण ज्ञानोबारायांनी यांचा विचार कधी केला नाही हीच माऊलीची विशेषतः आहे लहान मुलापांसुन ते अबालवृध्दा पर्यन्त अज्ञानापासून ते ज्ञानापर्यन्त ओवीच्या रूपाने ब्रम्हरसाची मेजवानी म्हणजे ज्ञानेश्वरी जी आपल्या साठी माऊली नी देली तिचा स्वीकार मनुष्याने स्वीकारला तर हरकत काय आहे मोक्षाचे पक्कान्न माऊलीनी सगळ्या करिता ठेवले आहे पण ते खाण्याची योग्यता असली पाहीजे लहान मुलाच्या पोटामध्ये जेव्हा भुक लागते तेव्हा त्याच्या  तांटामध्ये अन्न ठेवलेले  असते पण त्याला ते खाता येत नाही म्हणून त्ते उपाशी राहते 

तसेच माऊलीच्या ज्ञानेश्वरी रूपाने ब्रम्हरसाचे पारणे आपल्या साठी ठेवल आहे ते आपल्या ताटामध्ये ठेवले खरे पण ते खाता येईना हे आपले दुर्भाग्य म्हणावे लागेल त्याच कारण ही तसेच आहे बोल चागले आहे पक्कान्न चागले आहे पण दे कोणा करिता केले का तर  नाही का तर ते ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी विवेक वैराग्य सपन्नता श्रीमंत गरीब असा भेदभाव मुळीच नाही ज्ञानोबाराय सांगतात हे पक्कान्न कोणाला मिळेल तर जो निष्काम असेल ज्याच्या अंतं करणात कुठल्याच प्रकारची ईच्छा नाही त्याला ते मिळेल 

अतः करणात अपेक्षा नसली पाहीजे निरपेक्ष जीवन असावे जो अपेक्षा करतो त्याची उपेक्षा होत असते आणि जो निरपेक्ष राहतो समाज त्याची अपेक्षा करतो माऊली सांगतात ज्यांची लायकी अर्जुनाच्या योग्यतेची असेल अर्जुनाची योग्यता सामान्य थोडीच होती तुम्ही पक्तीला कोणाच्या बसता यावर पक्कान्न ठरलेले असते तुम्ही जर दुष्ट माणसाच्या पक्तीत बसला तर  तुम्हाला पक्कान्न येणार नाही सज्जनाच्या पंगतीत बसा तुम्हाला नक्कीच पक्कान्न मिळाल्याशिवाय राहणार नाही माणसाने संगत चागली केली पाहीजे तरच तुमचे सस्कार सुध्दा चागले दीसतील सद्य स्थीतीत संस्कारच खरी संपती आहे ते जपले गेले तर आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान मनुष्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही 

या काल्याच्या प्रसंगी महाराजानी धावत्या वेळेत कृष्ण चरिञावरही प्रकाश टाकला या प्रसगी बाबुसिगं महाराज जनकवार भाऊ सिह जनक वार पाडू जनकवार किरण जनकवार बाळू जनकवार जनार्धन स्वामी ह भ प विष्णू महाराज बादाड कोरकणे महाराज सखाराम वाघ वामनराव शेळके आदीची ऊपस्थीती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत