जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ कदम तर उपध्यक्षपदी शंकर उबाळे बिनविरोध
परतूर दि. प्रतिनिधी
परतूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी गोकुळ कदम तर उपध्यक्षपदी शंकर उबाळे यांची बिनविरोध निवड.
शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शालेय शिक्षण समिती ची निवडणूक केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 रोजी दुपारी 12 च्या सुमारास कन्या शाळेच्या कार्यालयात पार पडली या वेळी केंद्रीय मुखध्यापक विष्णुपंत ढवळे, सत्यनारायन सोमाणी,श्रीमती वाईकर,श्रीमती कीर्ती सैदाने सह शाळेतील सहकारी उपस्थित होते.
शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार योगेश बरीदे,बाळासाहेब चव्हाण,वैभव बागल,श्री माने आदींनी सत्कार केला.