लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे जागतिक एड्स दिन साजरा       परतूर(प्रतीनीधी)    आज शनीवार रोजी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतूर, आयएसआरएसडी जालना, सेतू चॅरिटेबल ट्रस्ट जालना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे जागतिक एडस् दिना निमित्त युवका मध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.ज्ञानदेव नवल,जिल्हा पर्यवेक्षक राजेश गायकवाड, भास्कर पडूळ,शकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे उपस्थित होते.तसेच उपप्राचार्य डॉ.रवि प्रधान,उपप्राचार्य संभाजी तिडके, ज्येष्ठ प्रा.डॉ.एस.डी.तळेकर,प्रा. डॉ.नाईकनवरे व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते* .या प्रसंगी श्री शिवहरी डोळे यांनी एडस् विषयी सविस्तर मार्गदर्शन केले  तसेच या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकाचे निवारण केले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ सुसर यांनी आभार प्रकटीकरण केले . या कार्यकमा साठी आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवहरी डोळे,संतोष सम्मेटा लिंकवर्कर  स्कीम चे नरेश कांबळे, सिद्धेश्वर वायगुडगे,सेतु चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रियंका कांबळे यांनी मदत केली या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार