रामचरित मानस सप्ताहाताच आयोजकांचे निर्वाण, सोहळ्यात मात्र खंड नाही !,जयनारायणजी (मिठूशेठ)झंवर यांचे निधन
परतूर (हनूमंत दंवडे) दि 30 गुरूवार रोजी येथील प्रसिद्ध व्यापारी जयनारायणजी गोपूलालजी झंवर यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले मुत्यृ समयी त्यांचे वय 87 वर्ष होते.
आयोजकांचे निर्वाण तरीही
सोहळ्यात खंड नाही
------------------------------
प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामचरित पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते, व ते यजमान व आज सकाळी 10 वाजता एकादशी तिथीची विशेष कथा सोहळ्याची तयारी करताना यजमान मिठुसेठ याना अचानक छातीत त्रास झाला व सोहळा स्थळीच त्यांचे निर्वाण झाले, या तिथीला निर्वाण होणे भाग्याचे समजले जाते, शिवाय घरात धार्मिक सोहळ्याचा आठवा दिवस होता, व उद्या शुक्रवारी समाप्ती आहे, घरात आयोजक व यजमानाच्या निधनानंतर ही परिवाराने सायंकाळी सोहळ्यात खंड पडू दिला नाही, दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर सायंकाळी सोहळा कायम ठेवला, व त्याच उत्साहात उद्या समापन होणार आहे. या घटनेची शहरभर चर्चा होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुली ,सुना ,नातवंड पात्रूड आसा मोठा परीवार होता
शहरात यांचे फर्टीलायझर वस्त्राचे दालन आहे तसेच जालना व परतूर येथे त्यांचे फर्टीलाइजर व सिड चा व्यवसाय आहे
अंत्ययात्रेत शहरातील व्यापारी डॉक्टर्स वकील राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.