मौजे वाढोना येथील पांदण रस्त्याच्या कामाला उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली भेट


परतूर प्रतिनिधी(हनुमंत दवंडे)
जालना जिल्ह्यात प्रथमच परतूर तालुक्यातील वाढोना या गावातील  शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचा व येण्याचे तीनही पांदण रस्ते हे पावसाळ्यामध्ये अत्यंत चिखलमय होत असे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला शेतामध्ये बैलगाडी नेण्यासाठी मोटरसायकल, ट्रॅक्टर, या वाहनांना ये-जा करता येत नव्हती यामुळे गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी आपल्या लोकवर्गणीतून हा रस्ता करण्याचा ठरवले आणि हा रस्ता लोकवर्गणीतून तयार झाला, असून ते खडी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे आश्‍वासन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिले आहे.यावेळी उपस्थित अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना. , व सरपंच सुरेश शेळके, मंडळ अधिकारी देशपांडे साहेब, तलाठी चव्हाण साहेब ,                        यावेळी सुभाष शेळके ,नवनाथ तनपुरे ,अशोक तनपुरे सर ,कैलास शेळके सर, शिवनाथ शेळके, रामेश्वर शेळके ,कैलास शेळके, लखन तनपुरे ,सोपान थिटे, बालू हामिरगे, रामेश्वर शेळके ,आदी शेतकरी बांधव उपस्थित होते . तसेच गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री . भाऊसाहेब जाधव साहेब  यांचा सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत