तळणि येथे दोन दिवस किर्तन सोहळयाची सांगता

तळणी : (रवि पाटील ) श्री संताजी महाराज जगनाडे याच्या पुण्यतीथी निमित्य दोन दीवसन किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
प्रथम दीवशी  ह-भ-प विजय महाराज बनकर याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले तर दुसऱ्या दीवशी काल्याची किर्तन सेवा ह भ प अर्जुन महाराज बादाड याच्या वाणीतून या दोन दीवशीय कार्यक्रमाची सांगता काला करुन झाली जगदगुरू तुकाराम महाराज याच्या गाथेतील 
*भक्त ऐसे जाणा जे देही उदास*
*गेले आशापाश निवारुनी ॥१॥*
*विषय  तो त्यांचा झाला नारायण*
*नावडे जन धन माता पिता॥ ध्रू॥*
संत श्रेष्ठ जगनाडे महाराज यांची पांडूरंगावर जसी भक्ती होती त्याच प्रमाणे जगदगूरू तुकोबारायांवर सुध्दा मोठी निष्ठा व भक्ती होती तुकोबांरा यांच्या वाणीतून आलेला शब्द न शब्द लिहून ठेवल्यामुळेच आज आपल्याला गाथा डोक्यावर घेता येत आहे जगनाडे महारांजानी अंभगाच्या  ओव्याची व्यवस्थीत रचना लावल्यामुळेच आज हजारो किर्तनकार त्याच गाथ्यातील अंभगावर सपूर्ण महाराष्ट्रात किर्तन करत आहे संत जगनाडे महाराज यांचा मोठा अधिकार असल्याने त्याना संतपदाचा अधिकार प्राप्त झाल्यामुळेच त्याची पूण्यतिथी साजरी होत आहे तुकोबारायावर जगनाडे महाराजांची भक्ती असल्याकारनाने तुकोबारायांनी सुध्दा त्यानी आपलेसे केले महाराजांच्या वाणीतून निघालेला शब्दन शब्द लिहून ठेवणे म्हणजे ती एक प्रकारची भक्तीच होती त्याच भक्तीच्या जोरावर त्याना संतपदाचा दर्जा प्राप्त झाला असल्याने वारकरी सप्रंदाया साठी ते पूजनीय आहेत 
भारतभूमीवर व विशेष करून काल्याला अनन्यसाधारण महत्व आहे ती परंपरा संतांनी घालून दिली आहे ती आजतागायत सुरु आहे माणसाच्या आयुष्यातील काल्याला खूप महत्व संतांनी दिले आहे ज्याना संत सहवास झाला अशा संताजी महाराज्याच्या पुण्यतिथी हा काला म्हणजे दुग्धशर्करा योग आहे ज्या चौदा टाळकऱ्या पैकी एक असलेले संतांजी महारज याचे मोठे योगदान तुकाराम  महारांजाच्या जीवनात होते तुकोबारायाच्या अंभगाच्या रचना लिहुन काढणे व त्यांचे संगोपण करणे यातच त्यानी सपूर्ण आयुष्य वेचले म्हणूनच त्याना सतपंदाचा दर्जा प्राप्त झाला असल्याचे महारांजानी विषद केले
तसेच आजच्या या धावपळीच्या युगात मनुष्य स्वार्थी झाला आहे गोरगरीबांना तुच्छ लेखण्याची भावना वाढीस जात आहे मदत करण्याची प्रवृत्ती कमी होत आहे सुंख दुखात मनुष्य एकमेकाना विसरत आहे हा सगळा कलीचा प्रभाव असुन तो प्रभाव मनुष्य जातीवर होऊ दयचा नसेल तर त्याने आधात्माकडे वळले पाहीजे भगवत भक्ती केली पाहीजे तरच आयुष्याचे सार्थक होईल आजकाल व्यसन करण्याची खुध्दा फॅशन वाढली आहे या फॅशन मध्ये स्वःतच्या आयुष्याचे वाळवंट करून घेऊ नका असे आवाहन महाराजांनी उपस्थीताना केले भक्ती मार्गच माणसच्या आयुष्याला ऊभारणी देऊ शकतो संताच्या चरिञातून आपण हाच संदेश घेतला पाहीजे मोठ मोठी चरीञ ही मनुष्य जन्माच्या सार्थकासाठीच शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवली तीचे अध्ययन करा व पुण्यसंचयात वाढ करा असे प्रतिपादन महांराजानी या वेळेस केले

या काल्याच्या प्रसंगी महाराजानी कृष्ण चरित्रावर प्रकाश टाकला कृष्णाचे चरित्र हे त्यागाचे चरीत्र होते गोप गोपीना ञास देणारा कृष्ण सुध्द आपला साच वाटत होता गोपीची भक्ती शुध्द होती त्याच भक्ती मार्गावर चालण्याची आज गरज आहे संवंगड्याना घेऊन विविध लिला करणारा परमात्मा सर्वासांठी आदर्श व वंदनीय होय


'राम राम' म्हणून राम कसा भेटेल या
 विचारण्यात काहीच अर्थ नाही.  असे म्हणता येईल की, 'राम राम' म्हटल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही. व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे. समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो, आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का ? उलट, त्या गावातली माहिती काही नाही पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही; म्हणून नाम घेणेच जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. 

भगवंताच्या नामाची गरज दोन तर्‍हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी, आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला-प्यायला पोटभर, बायकोमुले, घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुध्दा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ, दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूरी आहे; नंतर, भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे; आणि शेवटी, भगवंताच्या दर्शनानंतर नाम संवयीने आपोआप येते. एकूण, आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते. जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा. 

भगवंताचे नाम हीच सच्चिदानंदस्वरूप सद्‍वस्तू होय. भगवंताच्या नामात जो स्वत:ला विसरला तो खरा जीवनमुक्त होय.
असे प्रतिपादन महाराजांनी केले 

मनुष्य हा भंगवंताचा भक्त असल्याचे सोग घेत आहे खरा भक्त कोण असू शकतो ज्याला देव म्हणेल हा माझा भक्त तो खरा भक्त ती खरी भक्ती जी जगनाडे महाराजानी संत तुकोबाची भक्ती पांडूरंग परमात्माची भक्ती. केली म्हणनच आज त्याची पूण्यतीथी होत आहे 

यावेळी भगवतांची गाई वर असलेली भक्ती गोपीकेची कृष्णावर असलेली भक्ती महाराजांनी विषद केली गाईचा साभाळ करा आई वडीलांचा आदर करा त्यांची सेवा करा गावरान गाय प्रत्येकांने साभांळा ती संकटात आहे तुम्ही जर गाईची सेवा केली तर ती भंगवतांची भक्तीच आहे जी की भंगवंताला प्रिय आहे त्यासाठी गाईचा आदर करा असा हितोप देश महाराजांनी यावेळी केला 
      यावेळी येणाऱ्या भावीकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पुण्य तीथी उत्सव समीतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी गावातील भजनी मंडळ माता भगीनी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते तरुण कार्यकर्त्यानी वाढपाचे सुंदर नियोजन यावेळी केले तसेच संत नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यानी साथ सगत केली यावेळी जनार्धन स्वामी पांडूरंग नाके नागेश भडदम सोमनाथ सोनुने गोपाल सोनुने विष्णू ऊबाळे सतिश सोनुने लक्ष्मण तेजबन अशोक सोनुने नेमिनाथ सोनुने शिवदास सोनुने विजय भडदम मारोती सोनुने विष्णुपंत सोनुने  आदीनी . कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड