खांडवी येथे लोकसहभागातून पांदण रस्त्याच्या कामाचे उद्घाटन,लोकसहभागातून पांदण रस्त्यांचा विकास म्हणजे गावाला समृद्धीकडे नेण्याचा मार्ग-राहूल लोणिकर

परतूर( हनुमंत दवंडे)
  गाव विकासात पांदण रस्ते हे अतिशय महत्त्वाचे असून कर्जमाफी गावाला समृद्धीकडे नेण्याचा तारखेचा उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले
  खांडवी तालुका परतुर येथे लोकसहभागातून साकारत असलेल्या पांदण रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
    पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की पांदण रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील उत्पादित माल ने आन करण्यासाठी महत्त्वाचा पर्याय असून खांडवी गावातील ग्रामस्थांनी या कामात पुढाकार घेतल्यामुळे आपण आनंदी असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
     मतदार संघाच्या विकासामध्ये आमदार लोणीकर साहेबांनी भर घातली खेड्यांना शहराशी डांबरीकरणाच्या मार्गाने जोडले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुलभ दळणवळण करण्यासाठी व्यवस्था झाली असल्याचेही यावेळी ते म्हणाले
     खांडवी गावातील ग्रामस्थांनी गाव विकासात पुढाकार घेतल्याचे कौतुक करतानाच ते म्हणाले की प्रत्येक गावाने खांडवी चा आदर्श समोर ठेवून लोकसहभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे असणारी पांदण रस्त्यांची कामे करावीत
या वेळी माजी जि प सदस्य अशोकराव बरकुले,सतिशराव गाडगे, सरपंच गणेश हरकळ, विठ्ठलराव बरकुले, भास्करराव बरकुले, दत्ता बरकुले, भीमा बरकुले, कान्होजी साळवे, मंडळ अधिकारी वरफळकर, तलाठी किरण जोशी, ग्रामविकास अधिकारी बागुल, पोलीस पाटील अंकुश बरकुले, दत्ता जगदाळे, बळीराम बरकुले, सीताराम बिलारे, बाबासाहेब भापकर, गणेश जगदाळे, विलास गाडगे, दत्ता ठोंबरे, यांच्या सह गावकऱ्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड