राजमाता जिजाऊ जयंती निमित्त हेलस येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले


मंठा (सुभाष वायाळ। दि.09  मंठा तालुक्यातील हेलस या गावी सलग 3  वर्षापासून राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या वर्षीही हेलस येथे सर्व कोरोनाचे नियम पाळून संभाजी ब्रिगेड हेलस शाखेच्या वतीने व श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी 30  पेक्षाही अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले,  कार्येक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेलस चे चेअरमन दिपक भाऊ खराबे यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्येक्रमास सुरुवात केली तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश घारे मंठा तालुकाध्यक्ष  बाळासाहेब खवणे व सर्व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्येकर्ते, जिजाऊ भक्त, गावकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश