दैठणा खु येथील शालेय व्यवस्थापन समितीचा सभापती कपिल आकात यांच्या हस्ते सत्कार
तालुक्यातील दैठणा खुर्द येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवडी नंतर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांच्या हस्ते शालेय समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय सवने यांच्यासह नूतन कार्यकारणीचा सत्कार केला.
यामध्ये नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष विजय सवने, उपाध्यक्ष बालाजी नखाते, सदस्य शीतल सवने, इरफाना शेख, ब्रम्हानंद तायडे, अतिष गाडेकर, बिबनभाई शेख, रेणुका लिंगायत, सरिता सवने, सुनिता पाईकराव, सुरेश काटकर, सागर सवने यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल सत्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे बंडेराव सवने, शिवाजी सवने सुरेशराव सवने, सरपंच सोनाजी गाडेकर, राजेश काटकर, महादेव सवने, दौलत सवने, रामा कचरे, दत्ता गाडेकर, पांडुरंग काटकर, बाळासाहेब ताठे लक्ष्मीकांत सवने, सुनील तायडे, शेख युनूस, शेख खमर, भगवान सोळंके, अशोक लिंगायत यांची उपस्थिती होती.