आंबेडकर नगर परतुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिन संपन्न
परतूर (हनुमंत दवंडे) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परतुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सभा आंबेडकर नगर मित्र मंडळ तर्फे आयोजित करण्यात आली
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल खरात सर,ॲड महेंद्र वेडेकर,प्रा.सिध्दार्थ पानवाले,ॲड माजीद पटेल तर अध्यक्षस्थानी पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ.राहुल रोहनकर लाभले.
माजी नगराध्यक्ष दादाराव पाडेवार,माजी नगरसेविका रमाबाई पाडेवार तसेच विद्यमान नगरसेविका प्रतिभा बंड उपस्थित राहील्या.
प्रा डॉ.रवी प्रधान सर यांचा समाजबांधवांतर्फे पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी आपापल्या संबोधनात भिमा कोरेगाव चा इतिहास आणि सद्य समाजस्थीती यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय बौध्द महासभा संस्कार विभाग तालुका उपाध्यक्ष हेमंत पहाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल याने केले.