परतुर मतदारसंघातील क्रिडा चळवळ जागृत ठेवण्यात कायमखानी सरांचा मोलाचा वाटा - मा.आ.सुरेशकुमार जेथलिया


परतुर - प्रतिनिधी(हनुमंत दवंडे )
गेल्या तिन तपा पासुन परतुर व परिसरात क्रिडा चळवळीचा वसा चालवत जागृत ठेवण्याचे मोलाचे कार्य सरफराज कायमखानी सर यांनी केले असल्याचे प्रतिपादन मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. जिल्हा परिषद शाळेचे क्रिडा शिक्षक सरफराज कायमखानी हे निवृत्त झाल्याने आयोजीत निरोप समांरंभात ते बोलत होते. जेथलिया यांच्या कार्यलयात सपन्न झालेल्या या सोहळयाला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, युवा नेते नितीनकुमार जेथलिया, काँग्रेस चे  तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, विलास झरेकर, इब्राहिम कायमखानी सह कार्यकर्त्यांची उपस्तीथी होती.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी कायमखानी यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की, शैक्षणीक कांलखंडात सुरवातीपासुनचं क्रिडा क्षेत्राचा लळा असलेल्या कायमखानी सरांनी नौकरी करत असतांना देखील शाळे वितरीक्त ईतर कुठेही क्रिडा स्पर्धो असल्यास हेरारीने सहभाग नोंदवत त्या स्पर्धो यषस्वी देखील करूण दाखवल्या , त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे .या व्यतिरिक्त परतुर सराख्या ठिकाणी राज्य स्तरीय स्पर्धो घेत त्यांनी ग्रामीण खेळाडुना एक प्रकारे न्याय देण्याच प्रामाणीक प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. त्याचे सर्वच राजकीय पक्ष असो वा सामाजीक संघटना याच्या सोबत स्नेहाचे संबध असुन भविष्यात निवृत्ती जिवनात त्यांनी क्रिडा चळवळ चालु ठेवत राजकीय क्षेत्रातही प्रवेश करावा,असा सल्ला यावेळी जेथलिया यांनी कायमखानी यांना दिला.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले