देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे क्रांती ज्योती
परतूर (हनूमंत दंवडे) सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*
आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील 35 विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक श्री संतोष चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शंकर चव्हाल, प्रा. प्रदीप चव्हाण , शाळेचे प्राचार्य श्री गजानन कास्तोडे आदी उपस्थित होते.