आपला देश लवकरच कोरोना मुक्त होईल. तहसिलदार रुपा चित्रक.

  परतुर (हनूमंत दंवडे)संपुर्ण जगात थैमान घालणार्या कोरोना या आजारातुन आपला देश लवकरच मुक्त होईल असा आशावाद परतुरच्या तहसिलदार रुपा चित्रक यांनी व्यक्त केला. आपल्या देशातील लोकसंख्येची घनता व लोकसंख्या मोठी असुनही सामाजिक अंतर व प्रभावीपणे राबण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम या मुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले .

पाटोदा[माव] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील पंधरा ते अठरा या वयोगटातील  विद्यार्थ्यांच्या लसिकरण कार्यक्रमाचे ऊद्घाटण प्रसंगी त्या बोलत होत्या. शिक्षक - पालक - संस्थाचालक यांच्या सहकार्यातुन या वयोगटातील संपुर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण आपण पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
    या कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेची प्रतीमा पुजन करुन झाली. 
कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी नेहा पुजरवाड यांनी लसीकरणाबाबत अनेक शंकाचे निरसन करुन लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले .कोणतीही शंका मनात न बाळगता पालकांनी आपल्या पाल्यास लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान आज रोजी वर्ग नववी व दहावी मधील श्याहाशि [86] विद्यार्थ्यांना कोव्हॕक्सीन ही लस देण्यात आली.

कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे ऊपाध्यक्ष तुळशिदासजी खवल ,आरोग्य रक्षक आर.आर. तोटे, जी.बी.बुधवंत , आरोग्य सेवक पि.एम.प्रधान ,आरोग्य सेविका श्रीमती एल.एस.वैद्य,मंडळाधीकारी शरद कुळकर्णी,कृष्णाजी सोनवने ,पालक प्रतिनीधी दिनेश खवल, छबुराव मुंढे,बालासाहेब नखाते,भिमराव शिंदे,सदाशीव खवल,मुख्याध्यापक अंभोरे सर आदी पस्थीत होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी तर  सुत्र संचालन चत्रभुज खवल यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.
     

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत