जालना जिल्ह्यासह परतूरकर गारठले : पारा घसरला..===..
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
जालना जिल्ह्यात परतूरसह राज्यात सध्या गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा खाली गेला आहे. या थंड हुडहुडी भरविली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील परतूरला किमान तापमान ९ अंशांवर पोहोचले असल्याची माहिती आहे.
हवामानात अचानक मोठा बदल होऊन रविवारी राज्याच्या बहुतांश भागावर धूळ आणि धुक्याचं मळभ निर्माण झाले होते. वाढलेल्या आर्द्रतेतून धुकं आणि धूळ वाढवणार्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
धुळीच्या वादळामुळे राज्यातील अनेक भागातील पारा घसरला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली आहे. २५ व २६ जानेवारी रोजी उत्तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली.
नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये कमाल तापमान नोंदवले गेलं आहे. तर, नंदुरबारसह नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे ही घट झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.