पत्रकार भारत सवने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
येथील पत्रकार भारत सवने यांना प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या वतीने स्व. श्रीकृष्ण भारुका स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार संघ पदाधिकारी आणि महावितरनाच्या कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
परतूर तालुक्यात भारत सवने यांनी २००९ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून गेल्या बारा वर्षापासून पत्रकारिता पदवी घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपल्या पत्रकरीतेतून प्रश्नांना निर्भीड वाचा फोडत सातत्याने न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. याची दखल घेऊन त्यांना परतूर तालुक्यात प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना शाखेच्या पहिला उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या झाल्याबद्दल पत्रकार संघटना, महावितरण, पोलिस, राजकीय, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला आहे.