ऊर्जामंत्र्यांच वागणं रजाकारी प्रवृत्तीचं, शेतकऱ्यांना दिलेल्या धमक्या सहन करणार नाही - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा इशारा,विजेच्या प्रश्नावर आमदार लोणीकर यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र========


प्रतिनिधी -हनुमंत दवंडे 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्रान्सफार्मर बंद न करणे किंवा विजेचे कनेक्शन न तोडणे प्रकरणी लक्ष देणे गरजेचे असताना ते मात्र रजाकारी वृत्तीने वागत आहेत प्रसारमाध्यमांवर जाहीर मुलाखतीदरम्यान शेतकऱ्यांना धमकावण्याचे काम ते करत आहेत महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील शेतकरी ऊर्जामंत्री यांचीही रजाकारी कदापि सहन करणार नाही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी आश्‍वासनाची पूर्ती केली तर नाहीच उलट ट्रांसफार्मर बंद करण्याचे आणि विजेचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देऊ अशी जाहीर धमकी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाते आहे ऊर्जामंत्री यांची ही रजाकारी आम्ही कदापि सहन करणार नाही ही बाब अत्यंत गंभीर असून आपण व्यक्तिशः यावर लक्ष देऊन शेतकऱ्यांची विजेचे कनेक्शन तोडले जाणार नाहीत किंवा ट्रान्सफार्मर बंद केले जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे सगळी पिके उध्वस्त झाली होती अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत माझ्या मतदारसंघात अगदी एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत एवढी भीषण अवस्था आज मराठवाड्यामध्ये आहे असे असले तरी देखील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडले जात आहेत ट्रांसफार्मर बंद केले जात आहेत निगरगट्ट झालेले प्रशासन याकडे मुद्दामहून डोळेझाक करत आहे असेही लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे

 तर अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही
जे अधिकारी शेतकऱ्यांची विजेचे कनेक्शन तोडतील किंवा ट्रांसफार्मर बंद करतील त्या अधिकाऱ्यांना आम्ही पळता भुई थोडी करू, आवश्यकता पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्याची गरज पडली तर ते देखील आम्ही करू प्रसंगी त्या अधिकार्‍यांना त्यांच्या खुर्चीत आम्ही बसू देणार नाही असा इशारा देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे दिला आहे.

मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून अशा प्रसंगी शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असताना शासनाने मात्र दमडीची देखील मदत शेतकऱ्यांना केली नाही मुख्यमंत्री म्हणून आपण रजाकारी प्रवृत्तीच्या ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांना शेतकरी विरोधी भूमिका न घेणे बाबत तात्काळ समज द्यावी व ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन न तोडणे किंवा ट्रान्सफार्मर बंद न करणे याबाबत तात्काळ आदेशित करावे अन्यथा महावितरण विरोधात आम्हाला आक्रमकपणे आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा लोणीकर यांनी पत्राद्वारे दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक विचार करून नक्की सहकार्य करतील अशी अपेक्षा लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश