सामान्य जनतेच्या कामास विलंब करून मनमानी कारभार करणार्‍या तहसिलदारांची बदली करा -- अच्युत पाईकराव


परतूर – प्रतिनिधी/हनूमंत दंवडे
सामान्य जनतेचे तहसील कार्यालयातून वेळेवर कामे होत नसून कामास विलंब करून मनमानी करणार्‍या तहसिलदार यांची तात्काळ बदली करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जालना                                                  जिल्हा उपाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर तालुक्यामध्ये सामान्य नागरिक आपल्या राशन कार्ड, संजय गांधी योजना, शेती प्रकरणे, पी.एम.किसान योजना, निवडणुकीच्या मतदार नाव नोंदणीसह, तालुक्यातील बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करून जनतेला वेठीस धरत असल्याने माहिती घेणे देणे यासह आदि समस्या संदर्भात चकरा मारीत असून अनेकांच्या समस्या सुटत नाहीत. तहसिलदार या कार्यालयात नियमित तसेच वेळेवर येत  नसल्याने कर्मचारी वर्ग मनमानी करीत असल्याने सामान्य जनता वेठीस धरून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे विविध कामे खोळंबली आहेत. तहसिलदार या सामान्य जनतेचे कामे करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच महसूल कर्मचारी यांच्यावर वचक नसल्याने यांची येथून तात्काळ बदली करून निलंबन करावे. तसेच पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील नागरिकांना घरकुल मिळाले आहेत. त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभर्थ्यांचे स्थळ पाहणी करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना असताना गटविकास अधिकारी पंचायत समिती हे दुर्लक्ष करीत आहेत. तात्काळ स्थळ पाहणी प्रक्रिया सुरू करावी. नसता दि. १९ जानेवारी २०२२ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, अच्युत पाईकराव, सोमेश्वर गायकवाड,  भाऊराव आखाडे, दीपक मुंढे, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती