तळणि येथे क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जंयती साजरी, विद्यार्थ्यांना कापडी पिशवी चे वाटप

तळणि(रवी पाटील)आज दि 03 जानेवारी 2021 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जालना अंतर्गत मातोश्री रमाई लोकसंचलित साधन केंद्र तळणी व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व माविम यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती साजरी करण्यात आली 
       क्रातीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त क्रेदिय प्राथमिक शाळा तळणी व जिल्हा परिषद प्रशाळा तळणी या ठिकाणी कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.सदरिल कार्यक्रमास क्रेदिय प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री जे.डी.इंगळे सर,जिल्हा परिषद प्रशाळेचे मुख्यध्यापक श्री.आर .एल.चव्हाण सर,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थांनी शाळेच्या शिक्षिका श्रीमती आकाळ तर प्रमुख पाहुणे म्हणुन मातोश्री रमाई लोकसंचलित साधन क्रेद्रांच्या व्यवस्थापक श्रीमती.लता चव्हाण ,लेखापाल सतीश सरकटे हे होते.यावेळी  सतीश सरकटे यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जिवनचरिञावर  मार्गदर्शन केले तर लता चव्हाण यांनी प्रदुषण नियंञण ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेचे शिक्षक श्री गारोळे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्रीमती श्वेता येलेकर  यांनी मानले
     .या प्रसंगि कार्यक्रमाला मातोश्री रमाई लोकसंचलित साधन क्रेद्रांच्या सहयोगिणी.श्रीमती.सुवर्णा कंबळकर,श्रीमती.संगिता पवार,क्रेद्रिय प्राथमिक शाळेचे व जिल्हा परिषद प्रशाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका,बचत गटातील महिला.डॉ.सुनिल सरकटे विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले