८९ च्या बॅच च्या वतीनेजि.प प्रशालेच्या गुणवंतांचा सत्कार


परतूर: हनुमंत दवंडे 
येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या सन 89 90 या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर सतीश लालचंद मुंदडा यांच्या तर्फे प्रति वर्षी जिल्हा परिषद प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला जातो. यावर्षीही प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वर्षभरात शालेय शिस्त, अभ्यास, वर्तणूक, वर्षभरातील शालेय सहभाग, शालेय शिष्टाचार या सर्व गुणसंपन्न असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पुरस्कार दिला जातो,   यावर्षी निवड झालेल्या विद्यार्थी मध्ये प्रथम पारितोषिक प्रांजल पेंदु मैसनवाड(वर्ग१०वि), तर दितीय ऋतुजा भास्कर घोडके(वर्ग१०वि), तर नववी वर्गातील कुमारी प्रतीक्षा सुरेश भुम्बर या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. 
तसेच या वेळी ८९ बॅच चे माजी विद्यार्थी राहुल कुंपावत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वाचनासाठी भावी जीवन उज्वल करण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तके शाळेला मुकुंद देशमुख यांचे हस्ते भेट दिले.
या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे, द.या. काटे, ८९-९० बॅचचे माजी विद्यार्थी मुकुंद देशमुख, संतोष शर्मा, मुख्याध्यापक विष्णू कदम सर शालेय समिती सदस्य ज्ञानेश्वर बरिदे, सविता कांबळे, शाळेचे शिक्षक लिंगनवाड सर, गणेश राठोड, देविदास आठवे, अरुण भांडवलकर, कैलास गाडगे, सतीश नाईक, खलील देशमुख, शिलेवार मॅडम, माने मॅडम, कोळकर मॅडम, आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत बरिदे सर यांनी केले तर शेवटी कैलास गाडगे यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले