स्वामी विवेकानंद कॉलेज येथे करियर कौन्सिलिंग व स्पर्धा परीक्षा व्याख्यान संपन्न- अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन व जिद्द यामुळे यश मिळणे सोपे- सतीश कुलकर्णी

  
मंठा (सुभाष वायाळ)दि.01आजचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे, स्पर्धेला तोंड देऊनच  प्रत्येकाला पुढे जायचे  आहे. मात्र त्याठी योग्य मार्गदर्शन व अथक परिश्रमाची जोड असेल तर यश मिळणे सोपे जाईल , स्पर्धेसाठी मेहनतीची तयारी असेल तरच यश आपल्या पदरात पडेल असे प्रतिपादन मंठा नगरपंचायतचे मुख्यधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांनी केले.ते येथील स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय आयोजित करिअर कौन्सेलिंग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालचे  प्राचार्य सदाशिव मुळे हे होते,  तर प्रमुख पाहुणे म्हणून मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय देशमुख,  पोलीस उपनिरीक्षक राऊत साहेब,  पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे साहेब,उपप्राचार्य डॉ. सदाशिव कमळकर ,उपप्राचार्य डॉ.बापू सरवदे,उपप्राचार्य श्री.ए.डी. खरात सर, करियर प्लेसमेंट सेलचे प्रा.डॉ.भरत धोत्रे,प्रा. राजेंद्र काकडे, इ. व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी यांचा राज्य लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उप अधीक्षक ( Dy. S.P)  पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा  महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुढे बोलताना श्री कुलकर्णी म्हणाले की स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी स्वतःतील न्यूनगंड कमी करणे, तसेच भाषा कोणतीही असो भाषेवर आपलं प्रभुत्व असले  पाहिजे याबरोबरच वृत्तपत्र मधील संपादकीय लेखांचे वाचन व आपल्याला आवडत असलेल्या विषयांमध्ये सखोल अभ्यास करून तो विषय ऑपस्नल विषय म्हणून निवडावा तसेच त्यांनी  स्वतः अनुभव सांगून स्पर्धा परीक्षेत यश कसे मिळवले याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा विषयी असणाऱ्या विविध प्रश्नांना योग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी
 पोलीस निरीक्षक श्री. संजयजी देशमुख साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे साहेब यांनी ही पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी   कशी तयारी करावी लागते याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना  प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे सर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व महाविद्यालयातील करियर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेल मार्फत  देण्यात येणाऱ्या विविध सुविधा विषयी माहिती देण्यात  आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अच्युत मगर यांनी केले, तर डॉ राजेंद्र काकडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार  प्रा. डॉ. भरत धोत्रे  यांनी मानले.  याप्रसंगी   प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर,कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते,

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड