मनुष्याचे शब्दरूपी कार्य विसरते मात्र कृती जीवंत राहते हभप भगवताचा-र्य - रूपालीताई सवने

परतूर – हनूमंत दंवडे             
समाजात वावरत असतांना मनुष्याने केलेली शब्दरूपी मदत विसरू शकते मात्र कृतीतून केलेली मदत कायम स्मरणात जीवंत राहते असे प्रतिपादन हभप भागवताचा-र्य रूपालीताई सवने यांनी केले. लॉयन्स क्लब परतूरच्या वतीने हभप रूपाली सवने व बाल कवियत्री श्रावणी बरकुले यांचा सन्मान करून सत्कार प्रसंगी बोलतांना रूपाली सवने यांनी केले.
यावेळी पुढे बोलतांना हभप रूपालीताई सवने म्हनाल्या की पीडितांचे दुखदूर करण्यासाठी समाज प्रबोधनातून कार्य केले जाते. प्रबोधनातून सांगितलेले कार्य समाज विसरू शकतो मात्र कृतीतून केलेले कार्य मनुष्याच्या कायम स्मरणात राहते ते कार्य आज लॉयन्स क्लबच्या माध्यमातून नेत्रसेवेचे कार्य होत असून समाज हे कार्य कदापि विसरू शकत नाही. लॉयन्स क्लब आज समाजातील वंचित घटकांना सेवा कार्य करून त्यांना नवी दुर्ष्टी देण्याचे कार्य नव्या जगाची ओळख त्यांना या माध्यमातून देत आहे. गरजू पीडितांना मदत करणे आणि माणुसकी प्रत्येकांच्या मनात जागवणे हाच खरा परमार्थ असल्याचे वारकरी संप्रदाय सांगत आहे. प्रत्येकाने गरजू आणि पीडितांना मदत करण्याचे आवाहन हभप सवने केले. तर याप्रसंगी लॉयन्स क्लबचे मनोहर खालापुरे यांनी बोलतांना सांगितले की आज पर्यंत पस्तीस  हजार पेक्षा अधिक रुग्णाची नेत्र तपासणी करून आठ हजार रुग्णाच्या डोळ्याच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. यापुढे पुढील वर्षात परतूर शहरात लॉयन्स क्लबच्या माध्यमातून डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी या कार्यक्रमाला रामेश्वर नळगे, मनोहर खालापुरे, संजीवनी खालापुरे, रेवती राखे, अमित खालापुरे, डॉ. सुनीता खालापुरे, हभप रामेश्वर महाराज सवने, संदीप दाभाडे, रामेश्वर राजबिंडे, शाम बरकुले, प्रमोद टेकाळे, प्रशांत राखे, बोराडे, सोपान बोराडे,  सुनील खालापुरे, डॉ काळे, डॉ गायकवाड, गणेश हारकळ, चौधरी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती