उस्वद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी


 मंठा-(सुभाष वायाळ)दि.03 मंठा तालुक्यातील ऊस्वद येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  
    यावेळी शेतमजूर युनियनचे जिल्हासचिव कॉम्रेड सचिन थोरात, राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड स्वाती थोरात यांची उपस्थिती होती..ज्या काळात महिलांना शिक्षण घेणे अशक्य होते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी कर्मठांकडून होणारा शेण, दगड, चिखल यांचा मारा सहन करून मुलींना शिक्षण देण्याचे असाध्य कार्य यशस्वी केले. त्यांनी त्यांच्या कवीतांच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कुटुंबाचा उद्धार करायचा असेल तर स्त्रियांनी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे त्या ठासून सांगत. महिलांचे होणारे शोषण वेगवेगळ्या क्षेत्रात अत्याचार सहन न करता रणरागिणी सारखे आधुनिक कल्पना चावला ,सुनिता विल्यम्स, मीरा बोरवणकर, यांच्या सारखे कर्तृत्व सिद्ध करुन शिक्षण, आरोग्य ,उद्योग ,प्रशासकीय क्षेत्रात नाव उंचावून आई वडिलांचे नाव रोशन करुन समाजात आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन शेतमजूर युनियन लालबावटाचे जिल्हा सचिव काँ सचिन थोरात यांनी केले. त्यासोबत आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी भुमिहीन, शेतमजूर महिलांचे जमीन, घर,रोजगार, पेन्शन आदी प्रश्न सोडवून त्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी सतत प्रयत्न करणार असे कॉ सचिन थोरात यांनी सांगितले .यावेळी युनियनच्या राज्य कमिटी सदस्य काँ स्वाती थोरात यांनी बोलताना सांगितले की,समाजातील नागरिकांनी आपल्या घरांतील  महिलांना जसे की आई,, पत्नी, मुलगी यांना सर्वच क्षेत्रात पुढे आणुन महिला सक्षमीकरण द्रुढ करावे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणावे असे सांगितले .यावेळी शेतमजूर युनियन गाव कमिटी सदस्य संतोष कांबळे, विकास कांबळे, बाळु कांबळे ,लता अंभोरे ,चंद्रकला नवघरे,भगवान अंभोरे, आत्माराम कांबळे आदी सह शेकडो शेतमजूर उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश