सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सामाजिक उपक्रम राबवत परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन वह्या वाटप....!


परतूर/प्रतिनिधी:-हनुमंत दवंडे

तालुक्यातील वरफळ येथील जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट व परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे निमित्त साधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

परिवर्तन युवा ग्रुपचे संचालक योगेश खंडागळे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले याला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट यांच्या मार्फत शालेय साहित्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन आणि वह्या चे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात  सम्राट अशोक नगर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट, सरपंच नदीम पटेल,ग्रामसेवक श्री राऊत,शाकेर मापेगावकर,ग्रामपंचायत सदस्य उद्धव गोरे,सुभाष खंडागळे,वहिद पठाण,गजानन गोरे,जुबेद शेख,संदीपान रुपनर, प्रमोद उबाळे,प्रल्हाद गोरे, मापेगावचे सरपंच बापूराव दुगाने,मुख्याध्यापक सरफारज कायमखानी,परिवर्तन ग्रुपचे योगेश खंडागळे, रोहित मगर,आर्या खंडागळे, मारोती खंडागळे, आकाश भदर्गे यांच्या सह शाळेतील शिक्षक व अन्य गावकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत