लोणी येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गूळ युनिट चे उद्घाटन

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
 आष्टी व कोकाटे हादगाव सर्कल मधील शेतकरी प्रचंड प्रमाणात ऊस लावत असतात, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबणा होऊ नये या उद्देशाने लोणी खुर्द येथे सुरू होत असलेले हे गुळ युनिट शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
ते लोणी खुर्द तालुका परतुर येथे प्रथमेश ऍग्रो इंडस्ट्रीच्या गुळ युनिट चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते
  पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय सुरू करणे ही काळाची गरज असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्यपालन त्याचबरोबर शेतमालावर आधारित छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज असून या भागातील तरुणांनी या कामात पुढाकार घेतल्यास निश्चितपणे आर्थिक क्रांती घडून येणार असल्याचे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले
     पुढे बोलताना ते म्हणाले की, या भागांमध्ये जलयुक्त शिवार च्या माध्यमातून जलक्रांती झाली असून या ठिकाणच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे त्यामुळे या भागांमध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल ऊस लागवड करीत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले पैठण धरणाचा डावा कालवा व पाण्याचे इतर स्त्रोत उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळबागा व पाण्याखालील क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे याचा फायदा घेत या भागात व्यापार-उदीम उद्योगधंद्यांना उभे करण्याची जबाबदारी युवकांवर असून त्यासाठी आपण सदैव पाठपुरावा करण्यास तयार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले
या भागातून शेगाव पंढरपूर सारखा राष्ट्रीय महामार्ग आपण खेचून आणत दळणवळणाची उत्तम माध्यम उपलब्ध करून दिले असून वाड्या-वस्त्यांवर पोहोचण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांना आवागमन करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या विजेचा विचार करून आपण मंत्री असताना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अनुक्रमे कोकाटे हदगाव व  कऱ्हाळा येथे 33 केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी करून कमी दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठा हा प्रश्न निकाली काढला आहे त्या मुळे या भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले असल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले
======================
*आष्टी क्लस्टरचा राष्ट्रीय रुरबन योजने अंतर्गत विकास*
=====================
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजनेच्या माध्यमातून 325 कोटी रुपयाच्या आराखडा मधून मोठा विकास झाला असून या भागासाठी प्रस्तावित असलेली मिनी एमआयडीसी कार्यान्वित करणे व शेतकरी समूहांच्या मालकीच्या शेती उत्पादित मालावर आधारित प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या स्थापन करून सुरू करणे ही आपली महत्वकांक्षा असून या माध्यमातून शेतकऱ्यांचा मोठा विकास होईल यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे या वेळी आमदार लोणीकर यांनी नमूद केले
  विकास हा आपला स्थायीभाव असून आपण राज्याचे मंत्री असताना जिल्ह्यासह मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला मतदार संघात विकास कामे करत असताना मतदारसंघाचा समतोल विकास करण्यावर भर देत गोदे पासून पूर्णे  पर्यंत डांबरीकरणाच्या रस्त्याचे जाळे निर्माण केले सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सिमेंट नाला बांध नदी खोलीकरण रुंदीकरण या माध्यमातून मोठे काम या मतदारसंघात उभे केले मतदारसंघातील  नेर शेवली चा भाग असो युवा मंठा तालुक्यातील तळणी जयपुर चा परिसर असो या सर्व भागांमध्ये विकास कामे करून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले 
 या वेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्यासह प्रथमेश ॲग्रो इंडस्ट्रीज चे संचालक दिनेश देशमुख राघवेंद्र देशमुख तसेच बाबाराजे देशमुख जिजा यादव सुदाम प्रधान विक्रम तौर पंजाबराव बोराडे बंकट नाना सोळंके रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात माणिकराव वाघमारे सुरेश सोळंके गजानन लोणीकर बाळासाहेब यादव सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड