पोलिसांना हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल...
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक18/ 2/ 2022 रोजी प्रकाश सूर्यकांत ढवळे रा.कोकाटे हादगाव याने पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर कॉल करून देत असलेली माहिती ही खोटी आहे. याची त्याला पूर्ण माहिती असतानासुद्धा त्यांनी या क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती दिली .म्हणून त्याच्या विरुद्ध पोलिस ठाणे आष्टी एन. सी. आर. नं 44/ 2022 कलम 182 भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. सदरील कारवाई मा. श्री. विनायक देशमुख पोलीस अधीक्षक साहेब जालना ,मा. श्री. विक्रांत देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक जालना, तसेच श्री .राजू मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवाजी नागवे , सपोनि तथा प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे आष्टी, मुं ढे कॉन्स्टेबल ,राठोड साहेब, यांनी ही कारवाई पार पाडली. शिवाजी नागवे तथा प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे आष्टी यांनी आव्हान केले आहे की अशा प्रकारे प्रशासनास खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यास अशाच प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.